नागपूर, 17 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) नागपुर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच या स्फोटात 3 जण जखमी झाले आहेत. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 9 वाजता हा स्फोट झाला. मात्र या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेचा तपास नागपूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.
https://x.com/ANI/status/1736259290451874135?s=20
दरम्यान, हा स्फोट इतका मोठा होता की, या स्फोटाचा आवाज काही किलोमीटर अंतरावर गेला होता. त्यामुळे हा स्फोट घडल्यानंतर या कंपनीच्या परिसरात लोकांनी मोठी गर्दी केली आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या ही आग विजवण्याचे काम सुरू आहे. तसेच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
https://twitter.com/ani_digital/status/1736272729215545527?s=19
तत्पूर्वी, या दुर्घटनेच्या वेळी कंपनीत 12 कामगार काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या याठिकाणी बचावकार्य सुरू आहे. तर या कंपनीच्या आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करीत आहेत. तसेच या दुर्घटनेत 3 कामगार जखमी झाले आहेत. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या स्फोटाच्या आवाजाने लोक भयभीत झाले असून, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.