तामिळनाडू, 02 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) तामिळनाडूच्या सरकारी डॉक्टरकडून 20 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एका ईडी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अंकित तिवारी असे अटक केलेल्या ईडी अधिकाऱ्याचे नाव आहे. अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने त्याला 15 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर याप्रकरणाचा तपास सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे.
दरम्यान, अंकित तिवारी या ईडी अधिकाऱ्याला तामिळनाडूच्या दिंडीगुल येथील एका सरकारी डॉक्टरकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना तामिळनाडूच्या दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने रंगेहात पकडले. अंकित तिवारी हा अधिकारी मदुराई येथील ईडीच्या प्रादेशिक कार्यालयात कार्यरत होता. त्यानंतर याप्रकरणी दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने मदुराई येथील ईडीच्या प्रादेशिक कार्यालयावर धाड टाकली. तर अंकित तिवारीने याआधी पैशांच्या मागणीसाठी कोणाला धमकावले आहे का? याची सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे.
चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी विजय
तत्पूर्वी, दिंडीगुल येथील एका सरकारी डॉक्टरच्या विरोधात एका प्रकरणाचा खटला सुरू होता. “याप्रकरणात तुम्हाला तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ द्यायची नसेल तर, मला 3 कोटी रुपये द्या”, अशी मागणी ईडी अधिकारी अंकित तिवारीने या डॉक्टरकडे केली. शेवटी या डॉक्टरने त्याला 51 लाख रुपयांची लाच देण्याचे मान्य केले. या डॉक्टरने ह्या रकमेतील 20 लाख रुपये अंकित तिवारीला दिले. त्यानंतर अंकित तिवारीने या डॉक्टरला संपूर्ण 51 लाख रुपये देण्याची मागणी केली.
आमच्यावरील गुन्हे तातडीने मागे घ्या – जरांगे पाटील
सोबतच त्याने “हे पैसे दिले नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.” अशी धमकी दिली. त्यानंतर या डॉक्टरने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अंकित तिवारी विरोधात तक्रार केली. त्यानूसार तामिळनाडूच्या दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने अंकित तिवारी याला 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
One Comment on “20 लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले”