बारामतीत क्रांती दिनानिमित्त उपस्थित राहण्याचे आवाहन

बारामती, 8 ऑगस्टः बारामती शहरातील भिगवण चौकात हुतात्मा स्तंभासमोर क्रांती दिन साजरा करण्यात येत आहे. या क्रांती दिनानिमित्त उद्या 9 ऑगस्ट (मंगळवार) 2022 रोजी सकाळी 10 वाजता स्वातंत्र्याच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या क्रांतीकारक, स्वतंत्र सेनानी यांना अभिवादन करण्यासाठी तसेच क्रांती दिनाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्याक्रमाचे आयोजन बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना आणि बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना यांच्या वतीने करण्यात आला आहे.

बारामतीत बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

दरम्यान, मुंबई येथील (गोवालिया टॅक) ऑगस्ट क्रांती मैदान येथे भारत देश ब्रिटिशांच्या हुकुमशाहीतून मुक्त करण्यासाठी महात्मा गांधी यांनी 9 ऑगस्ट 1942 रोजी ‘चले जाव’, ‘भारत छोडो’ चा नारा दिला होता. तेव्हापासून 9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय नागरीक म्हणून क्रांती दिन हा दिवस साजरा करणे अत्यंत महत्वाचे आहे आणि ते आपले कर्तव्य आहे. क्रांतीदिन हा दरवर्षी संपुर्ण भारत देशात भारत सरकार तर्फे साजरा केला जातो. तसेच बारातती येथे सुध्दा बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना यांच्या तर्फे क्रांतीदिन साजरा करत असतात. तरी बारामतीतील सर्व नागरीकांनी, युवा विद्यार्थी- विद्यार्थीनी, व्यापारी, सर्व संस्थेचे पदाधिकारी, सर्व शाळा, महाविद्यालय, मुख्याध्यापक, शिक्षक, पदाधिकारी, सर्व संस्थेचे पदाधिकारी, सरकारी निमसरकारी अधिकारी, बारामती नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक कर्मचारी आणि सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना राष्ट्रीय पोषाख परिधान करीत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *