बारामती, 26 मे: (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मोढवे गावाजवळील मोरगाव निरा रोडचे काम काही ठिकाणाचे पुर्ण झाल्याने लहान मोठ्या गाड्या ह्या अतिशय जलद गतीने जात असतात. यामुळे या रस्त्याच्या कडेच्या गावांना व तेथील स्थानिकांना अपघात होण्याची भिती वाटू लागली आहे. असाच अपघात काल, गुरुवारी 25 मे 2023 रोजी दुपारीच्या सुमारास घडली.
सहाय्यक निबंधकांकडून सावकारांना अभय?
मोढवे गावातून काल, दुपारी 2 च्या सुमारास हरियाणा पासिंग असलेला मालवाहतुक ट्रक अतिवेगाने चालला होता. मोढवे गावातील एका वळणावर जोरात आल्याने वळण बसले नाही आणि तो ट्रक रस्त्याच्या कडेला जोरात आपटून अपघात घडला. या अपघातामध्ये ट्रक चालक किरकोळ जखमी झाला. मात्र ट्रक पलटी झाल्याने वाटाण्याचे पोती फाटून मोठे नुकसान झाले आहे.
आघात झाला त्यावेळी मुर्टी व मोढवे ग्रामस्थांनी ट्रक कडे धाव घेऊन जखमी ट्रक चालकाची चौकशी केली असता चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात आले. स्थानिकांनी पोलिस स्टेशन व दवाखाना यांच्याशी संपर्क साधून तत्काळ मदत केली.
मान्सूनपूर्व कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; बारामती पाण्यात बुडणार?
One Comment on “मोरगाव निरा मार्गावर भरधाव ट्रकचा अपघात”