अमित शाह यांच्या आज राज्यात दोन ठिकाणी प्रचारसभा

अमित शाह – 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याचा निर्धार

कोल्हापूर, 03 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या आजच्या दौऱ्याचा कार्यक्रम भाजपने जाहीर केला आहे. अमित शाह यांची आज दुपारी 12 वाजता कर्नाटकातील हुक्केरी येथे प्रचारसभा होणार आहे. त्यानंतर ते महाराष्ट्रात पोहोचतील. महाराष्ट्रात अमित शाह यांच्या आज दोन ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. यामध्ये अमित शाह यांची दुपारी अडीच वाजता रत्नागिरी येथे जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता सांगली येथे अमित शाह यांची सभा पार पडणार आहे. या सभेनंतर अमित शाह हे गोव्याला रवाना होणार आहेत.

https://twitter.com/BJP4India/status/1786077605713592496?s=19

अमित शाह यांच्या येथे सभा

दरम्यान, अमित शाह यांची आज रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. ही सभा रत्नागिरीच्या जवाहर मैदान गोगटे महाविद्यालय याठिकाणी दुपारी 2:30 वाजता होणार आहे. तसेच महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची आज सांगलीच्या विटा येथे दुपारी 4:30 वाजता जाहीर सभा होणार आहे. अमित शाह यांच्या या सभांसाठी भाजपचे कार्यकर्ते उत्सुक असून, सध्या या सभांची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

https://twitter.com/ddsahyadrinews/status/1786294127723749439?s=19

अमित शाहांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन

तत्पूर्वी, या प्रचार सभांसाठी अमित शाह हे काल रात्री उशीरा कोल्हापुरात दाखल झाले. त्यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले होते. त्यानंतर अमित शाह यांनी आज कोल्हापुरातील श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *