माळेगाव बुद्रुक परिसरातील आंबेडकरी समाजाचा पोलीस प्रशासनावर रोष!

माळेगाव बुद्रुक, 1 एप्रिलः माळेगाव बुद्रुक येथे वाघमारे नामक कुटुंबावर हल्ला करून जीवेमारण्याचा प्रयत्न झाला असतानाही गंभीर दुखापतीची कलमं लावली गेली नाही. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून अनुसूचित जातीतील एका महिलेस व तिच्या मुलासा जीव घेणा हल्ला झाला असतानाही पोलिसांकडून योग्य ती कार्यवाही केली गेली नाही. तसेच महिलेस मारहाण केली असतानाही तेही गुन्हे दाखल केले गेले नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये पोलिसांबद्दल रोष निर्माण झाला आहे. सदर कुटुंबास संरक्षणाची गरज असून आरोपींच्या बाजूने धनदांडगे व राजकीय दृष्ट्या प्रबळ लोक असल्याचे स्थानिक आंबेडकरी समाजाचे लोक सांगतात. फिर्यादी व साक्षीदारावर दबाव आणण्यासाठी आर्थिक व राजकीय गुंडांची मदत घेतली जात आहे.

बारामती तालुक्यात अनुसूचित जाती जमातीच्या लोकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. ईद व आंबेडकर जयंती या महिन्यात एकत्र येत असल्यामुळे सामाजिक तणाव वाढविण्यासाठी काही हितशत्रू जाणीव पुर्वक प्रयत्न करीत असल्याचे आमच्या प्रतिनिधीला गावात फिरत असताना समजले. मोर्चे, आंदोलने करून निवडणुकीच्या काळात राजकीय गैरफायदा घेण्यासाठी राजकीय लोक या प्रकरणाला वेगळी हवा देत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत काही जाणकरांनी व्यक्त केले. गावात गस्त वाढवून सदर कुटुंबला पोलीस संरक्षण देण्याची मागणी आरपीआयचे पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र सोनवणे व बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी केली आहे. तर माळेगाव नगरपंचायतीमध्ये शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्याची मागणी जोर धरत आहे.

या घटनेचे दुष्परिणाम तालुक्यात व जिल्ह्यात उमटू नये, म्हणून पोलीस प्रशासनाने या गुन्ह्यात सहभागी असलेले व गुन्हेगारांना पाठींबा देत असल्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी रविंद्र सोनवणे यांनी केली. रविंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वात एक शिस्त मंडळ जिल्हा पोलीस अधिकारी पुणे ग्रामीण यांना भेटणार असून बारामती तालुक्यात वाढत असलेले मागसवर्गीयांवरील अत्याचार रोखण्यासाठी लवकरच पोलीस, महसूल, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय कार्यकर्त्यांनी कमिटी निर्माण करून अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार बारामती तालुका असंवेदनशील म्हणून घोषित करावा, अशी मागणी रविंद्र सोनवणे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *