शाईफेक प्रकरणातील आंबेडकरी कार्यकर्त्यांचा अखेर जामीन मंजूर

बारामती, 14 डिसेंबरः पैठण येथील एका कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीबा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या महामानवांचा भाषणात अपशब्द वापरले. यामुळे राजसह संपूर्ण देशात बहुजन समाजात प्रतिक्रीया उमटत आहे.

उच्च न्यायालयाच्या निकालाला बानपकडून कचरा टोपलीची परंपरा कायम

असे असतानाच बारामती येथील आंबेडकरी कार्यकर्ता सचिन जगताप व कृष्णा सोनवणे यांच्यावर भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या बोर्डवर 13 डिसेंबर 2022 रोजी सकाळच्या सुमारास शाई फेक केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली.

सदर संशयित आरोपींना आज, 14 डिसेंबर 2022 रोजी बारामती येथील न्यायालयाने जामिन मंजुर केला आहे. सदर कार्यकर्त्यांची न्यायालयासमोर बारामती येथील अ‍ॅड. धीरज लालबिगे, अ‍ॅड. वैभव काळे, अ‍ॅड. रिना साबळे, अ‍ॅड. धीरज लालबिगे, अ‍ॅड. विवेक बेडके, अ‍ॅड. सुशील शिंदे, अ‍ॅड. बाबाजान शेख, अ‍ॅड.रियाज खान, अ‍ॅड. अजित बनसोडे, अ‍ॅड.विशाल गव्हाळे, अ‍ॅड.अमोल सोनवणे, अ‍ॅड. बापूसाहेब शिलवंत, अ‍ॅड.किरण सोनवणे, अ‍ॅड.स्वरूप सोनवणे, अ‍ॅड.सोमनाथ पाटोळे, अ‍ॅड. डी. पोंदकूले, अ‍ॅड.रविंद्र अवघडे, अ‍ॅड. अक्षय जाधव, अ‍ॅड. वैभव शेलार, अ‍ॅड.कमाल मुलाणी, अ‍ॅड.किशोर मोरे, अ‍ॅड.संदिप बनसोडे, अ‍ॅड.अक्षय शितोळे, अ‍ॅड.सुनिल शिंदे, उपस्थित होते. सर्वांनीच आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीने बाजू मांडण्यात आली.

बारामतीत राज्यपाल, पालकमंत्र्यांविरोधात निषेध मोर्चा

One Comment on “शाईफेक प्रकरणातील आंबेडकरी कार्यकर्त्यांचा अखेर जामीन मंजूर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *