बारामती, 26 मार्चः विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 132 वी जयंती महोत्सव होऊ घातला आहे. बारामतीमध्ये या महोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. मात्र असे असताना सर्व कायद्याचे नियमाचे व अटी शर्तीचे पालन करून सालाबाद प्रमाणे जयंती उत्सव उत्सवात साजरी करण्याचा निर्धार आंबेडकर समाज व समर्थकांनी व्यक्त केला असताना काळूराम चौधरी (रा. महात्मा फुले नगर हाऊसिंग सोसायटी) कायदा न मानणारा व्यक्तीने लाऊड स्पीकर बंदी करण्यासंबंधी समाजात गैरसमज निर्माण केला आहे. तसेच जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
अखेर चोरी गेलेले मोबाईल संबंधितांना केले परत
छत्रपती शिवाजी महाराज व दहीहंडी उत्सवात ज्या प्रमाणे लाऊड स्पीकरला परवानगी मिळाली, त्याच पद्धतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस मिळावी, अशी कायदेशीर मागणी आंबेडकर समाजाची, समर्थकांची असताना जयंती महोत्सवास विरोध करून पोलीस व प्रशासनावर पक्षपाताचा आरोप करत चौधरी यांनी लाऊड स्पीकर लावण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती समोर जाळपोळ करण्याचे धमकी दिली आहे. तसेच अशा पद्धतीची चित्रफित समाज माध्यमात प्रसारित केली आहे.
त्यामुळे समाजामध्ये जातीय द्वेष पसरला असून पोलीस प्रशासनाबाबत चौधरी यांच्या माध्यमातून आंबेडकरी समाज व समाजामध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व महाराष्ट्र शासन यांनी महापुरुषाच्या व ठराविक सण-वारांचा लाऊड स्पीकर लावण्यास परवानगी दिली असताना चौधरी हे आंबेडकर जयंतीस लाऊड स्पीकर लावण्यात बंदी घालून जाळपोळ करण्याचे आंदोलन करण्याची धमकी देत आहे. चौधरी यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून ते कायदा न जुमाणारे आहेत.
एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, ओबीसी आरक्षण वाचून खारीज!
आंबेडकर जयंती महोत्सव अडचण निर्माण करण्याचे व जातीय तेढ निर्माण करण्याची घटना घडल्यास बारामतीमध्येच नव्हे तर महाराष्ट्रभरात शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना हद्दपार करण्याची मागणी आंबेडकर समाज व समर्थकांनी दिनांक 25 मार्च 2023 रोजी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना सक्षम भेटून भीमसैनिकांनी निवेदन सादर केले आहे.
One Comment on “आंबेडकर द्रोह म्हणजे राष्ट्रद्रोही!; चौधरीला हद्दपार करण्याची युवकांची मागणी”