मुंबई, 14 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त आज (दि.14 एप्रिल) दादर येथील चैत्यभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला विविध राजकीय, सामाजिक आणि प्रशासनिक क्षेत्रातील मान्यवर तसेच बाबासाहेबांच्या अनुयायींची उपस्थिती होती.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1911665246420549820?t=7wT-HYCkkQqTeqzgUi-5mw&s=19
https://x.com/CMOMaharashtra/status/1911654809817808914?t=u_05Kr_zMZ804_4DZAsEzg&s=19
चैत्यभूमी परिसरात वृक्षारोपण
याप्रसंगी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते चैत्यभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणपूरक उपक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. तसेच, यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाची मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी संयुक्तपणे पाहणी केली.
https://x.com/CMOMaharashtra/status/1911654137273458730?t=113OWp-oYHaLO0-jHD8i4g&s=19
पोलीस दलाकडून मानवंदना
तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पोलीस दलाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना दिली. या शिस्तबद्ध आणि गौरवशाली सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपाल राधाकृष्णन यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
चैत्यभूमीवर अनुयायांची मोठी गर्दी
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांनी आज चैत्यभूमीवर मोठ्या श्रद्धेने उपस्थिती दर्शवली. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचे गीते, पोस्टर आणि बॅनरमुळे संपूर्ण चैत्यभूमी परिसर सामाजिक समतेच्या चैतन्याने भारावून गेला आहे. याप्रसंगी आलेल्या अनुयायांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.