भविष्यात सर्व महिला सैनिक देशाला नव्या उंचीवर घेऊन जातील – राष्ट्रपती

पुणे, 30 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145 व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते येथे 5 व्या बटालियनच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. यावेळी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, “राष्ट्रीय संरक्षण अकादमी हा देशाच्या नेतृत्वाचा पाळणा आहे, ज्याने महान योद्ध्यांना जन्म दिला. देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थांमध्ये या अकादमीचे विशेष स्थान आहे. सशस्त्र दल आणि देशासाठी एक मजबूत आधारस्तंभ म्हणून ओळखली जाते. मिळालेले प्रशिक्षण आणि जीवनमूल्ये जवानांना जीवनात पुढे जाण्यास मदत करतात”, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.



यावेळी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145 व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात संचलन करणार्‍या महिला सैनिकांचा सहभाग पाहून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आनंद व्यक्त केला. “हा दिवस खर्‍या अर्थाने ऐतिहासिक असून भविष्यात सर्व महिला सैनिक देश आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमीला नव्या उंचीवर घेऊन जातील”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी भारताच्या सीमांचे संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा आवश्यक असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी म्हटले आहे. “आम्ही ‘वसुधैव कुटुंबकम्’ या परंपरेचे पालन करतो, परंतु, देशाच्या एकता आणि अखंडतेच्या भावनेला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही बाह्य किंवा अंतर्गत परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमचे सैन्य पूर्णपणे सक्षम आणि तयार आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नमूद केले.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड कायम, बीसीसीआयची माहिती

तत्पूर्वी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल पुण्यातील लोणावळा येथे कैवल्यधामच्या शताब्दी वर्ष सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या ‘शालेय शिक्षण व्यवस्थेतील योगाचे एकीकरण-विचार प्रकट करणे’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, “योग ही भारताने जागतिक समुदायाला दिलेली अनमोल देणगी आहे. जगातील बहुतेक देशांमध्ये 2015 पासून दरवर्षी योग दिन साजरा केला जातो. योगाचा सराव आरोग्य आणि कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टीकोन प्रदान करतो. योग हा संपूर्ण जागतिक समुदायाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. हे शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रभावी साधन मानले जाते.”

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आजपासून 4 दिवसीय महाराष्ट्र दौरा

One Comment on “भविष्यात सर्व महिला सैनिक देशाला नव्या उंचीवर घेऊन जातील – राष्ट्रपती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *