बारामतीतील ‘या’ निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष!

बारामती, 1 जूनः बारामती नगर परिषद कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित बारामती या संस्थेचे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक 2022-23 ते 2027-28 साठी ही निवडणूक चोरशी होणार आहे. या पंत संस्थेसाठी एकूण मतदार संख्या 132 असून 13 संचालक मंडळाची संख्या आहे. या निवडणुकीत दोन पॅनल निवडणुकीसाठी सज्ज आहेत. सर्वसाधारण 8 जागेसाठी एकूण 16 उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.

कामगार सहकारी प्रगती पॅनल तर्फे (1) इंगुले हर्षल रतन (2) जोगदंड दादासो वसंत (3) ढमे भालचंद्र प्रल्हाद (4) देवकाते विलास लक्ष्मण (5) धुमाळ सुनील भगवान (6) लालबिगे उमेश दिलीप (7) शिंदे हनुमंत गजेंद्र (8) सोनवणे राजेंद्र बाबुराव असे 8 उमेदवार सर्वसाधारण जागेसाठी आहेत.

तर दुसरीकडे सर्वसाधारण जागेसाठी सहयोगी पॅनल तर्फे (1) अहिवळे दीपक महादेव (2) गायकवाड हनुमंत गेनबा (3) घोलप परशुराम विष्णू (4) पठाण मज्जिदखान अजिदखान (5) लालबिगे अजय प्रकाश (6) शितोळे विजय लक्ष्मण (7) शेख जमाल दिलीप (8) शेख मेहबूब कमरुद्दीन असे 8 उमेदवार रिंगणात आहेत.

 

यासह महिला प्रतिनिधीसाठी 2 जागा असून एकमेकांच्या विरुद्ध चार महिला उमेदवार उभ्या आहेत. यात गायकवाड मोनिका बाळासाहेब, नेटके संगीता दिलीप या दोन्ही महिलांचे निवडणूक चिन्ह रिक्षा आहे. तर भापकर सुवर्णा प्रभाकर, सोनवणे प्रतिभा मनोज यांचे चिन्ह कपबशी आहे.

ओबीसी प्रवर्गातून 1 जागेसाठी दोन जण रिंगणात उभे आहेत. उमेदवार आत्तार जावेद महमूद यांचे चिन्ह रिक्षा आहे. तर आत्तार फिरोज महंमद यांचे चिन्ह कपबशी आहे. भटक्या विमुक्त जातीसाठी विशेष मागास प्रवर्गात गदाई भारत विठोबा यांचे चिन्ह कपबशी आहे. तर चव्हाण संजय दत्तात्रय यांचे चिन्ह रिक्षा आहे. अनुसूचित जाती प्रवर्गात 1 जागेसाठी 2 उमेदवार एकमेकांविरोध उभे आहेत. रिक्षा चिन्ह घेऊन झेंडे भाऊसाहेब रामचंद्र तर कपबशी चिन्ह घेऊन सोनवणे रामचंद्र किसन हे निवडणूक लढवित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *