सर्व निर्णय सेटलमेंट करून घेण्यात आले, शरद पवारांचा आरोप

बारामती, 17 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह दिले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असे पक्षाचे नवे नाव दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शरद पवार यांनी यासंदर्भात आज प्रथमच पत्रकार परिषद घेतली. आपल्याबरोबर अन्यायकारक निर्णय होणार आहे हे ठरलेलंच होतं. हे सर्व निर्णय सेटलमेंट करून घेतलं गेलं आहेत, असा आरोप नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते बारामती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

https://fb.watch/qgbwCs1bI3/?mibextid=Nif5oz

पदाचा गैरवापर कसा होतो? याचे हे उदाहरण: शरद पवार

“विधानसभा अध्यक्षांचा निकाल आम्हा लोकांना न्याय देणारा नाहीच आहे, पण पदाचा गैरवापर कसा होतो याचे उदाहरण देशासमोर देण्यासंबंधीचा हा निर्णय आहे. आणि त्याला पर्याय आम्ही सुप्रीम कोर्टात हे प्रकरण दाखल केलेले आहे. आमची सुप्रीम कोर्टाला विनंती असणार आहे की, निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी मागणी शरद पवार यांनी यावेळी केली. अनेक प्रकारचे निर्णय असे झाले परंतु, पक्ष आणि चिन्ह हे दुसऱ्याला देणे याबाबत असा निर्णय कधी झाला नव्हता, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

हा अन्यायकारक निर्णय: शरद पवार

“सर्व जगाला माहिती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली, या पक्षाची उभारणी कोणी केली हे माहिती असताना देखील आणि वस्तूस्थिती असूनही पक्ष अन्य लोकांच्या हातात देणे हा एक प्रकारचा अन्याय करणारा निर्णय आहे. त्यामुळे, आम्हाला सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे. पक्ष आणि चिन्ह याबाबत त्यांनी नेहमीच जाहीर सभा, मेळाव्यातून सांगितलं की, पक्ष आणि चिन्ह आम्हाला इतक्या दिवसात मिळतील. तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की, हे सर्व निर्णय सेटलमेंट करून घेतल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. आपल्याबरोबर अन्यायकारक निर्णय होणार आहे हे ठरलेलंच होतं, त्यामुळे आम्ही पुढची तयारी करण्यासाठी सज्ज होतो, असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *