विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, पहा कोणाला किती मतदान झाले

मुंबई, 13 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. त्यानंतर या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून आले. 11 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. त्यासाठी एकूण 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यात भाजपने 5, शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 2, काँगेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रत्येकी 1 उमेदवार उभा केला होता. तर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने एका उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1811834075310703036?s=19

महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी

या विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. यामध्ये भाजपचे 5 उमेदवार विजयी झाले. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे देखील प्रत्येकी 2 उमेदवार निवडून आले. तर दुसरीकडे, या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येकी एका उमेदवाराने विजय मिळवला. परंतु यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिलेले शकापचे जयंत पाटील (12 मते) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हे उमेदवार विजयी

या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे परिणय फुके (26 मते), पंकजा मुंडे (26 मते), योगेश टिळेकर (26 मते), सदाभाऊ खोत (26 मते) आणि अमित गोरखे (26 मते) हे 5 उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे भावना गवळी (24 मते) आणि कृपाल तुमाने (25 मते) यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या शिवाजीराव गर्जे (24 मते) आणि राजेश विटेकर (23 मते) या उमेदवारांनी देखील या निवडणुकीत विजय मिळवला. तसेच काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव (25 मते) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर (23 मते) हे या निवडणुकीत विजयी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *