माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना, अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई, 09 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) शिवसेनेचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल मध्यरात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अभिषेक घोसाळकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र होते. दहीसरमध्ये ही घटना घडली. माॅरिस नोरोन्हा असे त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पैशांच्या वादातून त्याने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केल्याचे म्हटले जात आहे. यानंतर मॉरिसने देखील स्वत:वर गोळी झाडून आपले जीवन संपवले. तर या घटनेचा सध्या पोलीस तपास करीत आहेत. फेसबूक लाईव्ह दरम्यान ही घटना घडली. तर या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1755809927178694810?s=19

काय म्हणाले अजित पवार?

“अशी घटना महाराष्ट्रात घडायला नको होती. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, असे असतानाही जर असे प्रकार घडत असतील तर संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. पण या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी देखील पाहिली पाहिजे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांना मुद्दा सापडला: अजित पवार

सरकारला बदनाम करण्याचा आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा मुद्दा विरोधकांना सापडला आहे, हे मी नाकारत नाही. कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला मी समर्थन देत नाही. काल यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीही बैठक झाली असून, सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. असे अजित पवार यावेळी म्हणाले.

One Comment on “माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना, अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *