कर्जत, 01 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे चिंतन शिबिर सुरू आहे. या शिबिरातील सभेत अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविषयी खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शरद पवारांनीच त्यांचा राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन करण्याचे आदेश दिले होते, असा दावा अजित पवारांनी केला आहे. तसेच भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्वांबरोबर चर्चा करून घेतला. या चर्चेत सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
“शरद पवार यांनी मला 1 मे रोजी बोलावून सांगितलं होतं की, सरकारमध्ये जावा मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. घरातील चोघांनाच शरद पवार हे राजीनामा देणार असल्याची माहिती होती, बाकी कोणालाच याची कल्पना नव्हती. 2 तारखेला पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यावेळी येथील वातावरण वेगळं झालं. त्यानंतर यासंदर्भात अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.” असे त्यांनी यावेळी म्हटले.
जातीनिहाय जनगणना करण्याची अजित पवारांची मागणी
“या कार्यक्रमानंतर शरद पवार घरी गेले. त्यानंतर शरद पवारांनी आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की, उद्यापासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक, महिला आणि युवक पाहिजेत आणि त्यांनी तिथं राजीनामा परत घ्या म्हणून आंदोलन करायचं आहे. तिथं काही जण आंदोलन करायला बसले होते. यामध्ये जितेंद्र आव्हाड सोडले तर एकपण आमदार नव्हता. शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला. आम्हाला काहीच कळत नव्हतं काय चाललंय. मला एक सांगतात इतरांना एक सांगतात? असे अजित पवार म्हणाले.
देवदर्शनासाठी जात असलेल्या 8 भाविकांचा अपघाती मृत्यू
त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की, माझ्यानंतर सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा. याला सर्वांची सहमती होती. या सर्व गोष्टी ठरलेल्या होत्या. आम्ही 2 जुलै रोजी शपथ घेतली. 17 जुलैला आम्हा सर्व मंत्र्यांना चव्हाण प्रतिष्ठानला बोलावून घेतलं. निर्णय आवडला नव्हता तर बोलावलं कशाला? तसेच शरद पवारांनी आम्हाला अनेकदा गाफील ठेवलं. असा आरोप देखील अजित पवारांनी यावेळी केला.
One Comment on “शरद पवारांच्या राजीनाम्याविषयी अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट”