मुंबई, 17 जुलैः राज्यातील सत्तांत्तरानंतर माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना शिंदे- फडणवीस सरकारने मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्च ते जून 2022 मध्ये नगर विकास विभागाअंतर्गत मंजूर झालेल्या तब्बल 941 कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे. ही सर्व कामे अजित पवारांनी मंजूर केली होती.
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतली ढाले कुटुंबियांची भेट
सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातातून राज्याचा कारभार सुरु आहे. तुर्तास मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झाला नाही. मात्र आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांवर स्थगिती देण्याचे काम सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार करताना दिसत आहे. यात आता अजित पवारांच्या 941 कोटींच्या कामांना स्थगिती मिळाली आहे. विशेष म्हणजे या स्थगिती कामांमध्ये बारामती नगर परिषदेला वितरीत केलेल्या 245 कोटींच्या कामांनाही स्थगिती मिळाली आहे. यामुळे अजित पवार यांना हा मोठा धक्काच मानला जात आहे.