इंदापूर, 10 डिसेंबरः इंदापूर शहरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या हस्ते शरद कृषी महोत्सवाचे गुरुवारी, 8 डिसेंबर 2022 रोजी उद्घाटन करण्यात आले. या कृषी महोत्सवाला आज, 10 डिसेंबर रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भेट देणार आहेत, अशी माहिती कोकाटे यांनी दिली आहे. तसेच या शरद कृषी महोत्सवाचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहनही कोकाटे यांनी केले आहे.
माळेगाव कारखान्यांच्या ऊस वाहनांना रिफ्लेक्टर
इंदापूर शहरात नवीन नगरपालिकेच्या शेजारच्या मैदानात 8 ते 12 डिसेंबरदरम्यान शरद कृषी महोत्सव आयोजित केला आहे. या प्रदर्शनामध्ये अनेक प्रकारचे नवीन उपक्रम, शेतीमध्ये झालेली सुधारणा, त्यामध्ये मिळालेले उत्पन्न, अशा अनेक बाबी शेतकर्यांच्या माहितीसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्याचप्रमाणे जे स्वतः चांगल्या प्रकारची शेती करतात, त्यांचे शेतकर्यांना मार्गदर्शन राहणार आहे.
वैद्यकीय विद्यार्थ्याला नग्न करून लुटणाऱ्यांना अवघ्या 4 तासात अटक!
यासह शेती क्षेत्रातील शास्त्रज्ञदेखील मार्गदर्शन करणार आहेत. आपण नऊ डिसेंबरला महिलांचा मेळावा घेतलेला आहे. दहा तारखेला युवक महोत्सव घेतला आहे. या वेळी जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य सचिन सपकळ, अमोल भिसे, तात्यासाहेब वडापुरे, विठ्ठल ननवरे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, बाळासाहेब करगळ, छाया पडसळकर, रेहाना मुलाणी, शिवाजी तरंगे, संजय दोशी, संजय रूपनवर, श्रीधर बाब्रस आदी उपस्थित होते.
2 Comments on “शरद कृषी महोत्सवाला अजित पवार देणार भेट”