अजित पवार बारामतीतून निवडणूक लढविणार नाहीत? अजित पवारांच्या वक्तव्यामुळे खळबळ

मुंबई, 15 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले आहे. लोकशाही आहे, मला त्यात फारसा रस नाही. कारण, मी सात ते आठ निवडणुकांचा भाग झालो आहे. जनतेचा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा तसा कल असेल, तर संसदीय मंडळ याचा नक्की विचार करेल. असे विधान अजित पवारांनी केले आहे. तसेच संसदीय मंडळ आणि त्या भागातील कार्यकर्ते हे जी काही मागणी करतील ते आम्ही करायला तयार आहोत, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी जय पवार यांच्या बारामती मतदारसंघातील उमेदवारीवर दिली आहे.

https://x.com/ANI/status/1824018392778777003?s=19

जय पवार यांना उमेदवारी?

त्यामुळे जय पवार हे यंदा बारामती मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढविणार का? अशा प्रकारच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. अजित पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांचे हे विधान आज दिवसभर चर्चेत आहे. त्यावर अनेकांच्या विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे खरंच बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाहीत का? अजित पवार यांच्या जागी बारामतीत जय पवार यांना उमेदवारी दिली जाणार का? तसेच अजित पवार हे बारामतीतून नाही तर मग कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार? यांसारखे अनेक प्रश्न सध्या अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांवर आत्ताच बोलणे कठीण आहे. मात्र, येत्या काळात आपल्याला याची उत्तरे नक्कीच मिळतील. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या उमेदवारीवर काय निर्णय होतो? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बारामतीत कोणाला उमेदवारी?

तत्पूर्वी, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत होता. परंतु, लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता येत्या काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत बारामती मतदारसंघात विजय मिळवण्याचे लक्ष्य अजित पवारांचे असणार आहे. यासाठी अजित पवार हे कोणती नवी खेळी खेळणार? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *