दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला अजित पवार येणार नाहीत? सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

मुंबई, 14 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी पवार कुटुंबाच्या वतीने बारामती येथील शरद पवार यांच्या गोविंदबाग या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे या नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. यामध्ये कार्यकर्त्यांसह आमदार, खासदार, मंत्र्यांसह विविध अधिकारी, पदाधिकारी यांचा समावेश होतो.

विजय वडेट्टीवार यांना धमकी; सुरक्षा वाढवणार

दरम्यान दिवाळी पाडवा निमित्त आज सकाळपासूनच बारामतीतील गोविंदबाग येथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. आजही या ठिकाणी आपल्या आवडत्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रांग लागली आहे. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून कार्यकर्त्यांनी दिलेल्या दिवाळीच्या शुभेच्छांचा स्वीकार केला जात आहे.
तत्पूर्वी राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर हा पहिलाच दिवाळी पाडवा आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळी पाडवा कार्यक्रमात पवार कुटुंबीय एकत्र येणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अजित पवार हे दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने लोकांना भेटणार नाहीत, अशी माहिती अजित पवारांनी दिली होती.

मुख्यमंत्र्यांनी दुर्धर आजारांवर मात केलेल्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली

यासंदर्भात, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार यांच्याविषयी प्रश्न उपस्थित करण्याचे कारण नाही. अजितदादा यांना डेंग्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कोणत्याच कार्यक्रमांना हजेरी लावलेली नाही. तसेच रोहित पवार देखील संघर्ष यात्रेच्या निमित्ताने राज्यातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करीत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. याशिवाय राज्यात महागाई, दुष्काळ, रोजगार आरक्षण यांसारखे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नातून जनतेची सुटका व्हावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करते. अशा सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

One Comment on “दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला अजित पवार येणार नाहीत? सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *