सोमेश्वर कारखान्याचा अजित पवारांच्या हस्ते गळीत हंगाम शुभारंभ

बारामती, 10 ऑक्टोबरः बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते 9 ऑक्टोबर 2022 रोजी संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. गळीत हंगाम कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

मुर्टीत संत बाळूमामा यांची जयंती साजरी

मुलींच्या जन्मदरवाढीत बारामतीसह इंदापूरचाही समावेश

या कार्यक्रमप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, तसेच माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, संचालक संभाजी होळकर, तसेच सोमेश्वर कारखान्याचे सर्व संचालक, कामगार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *