बारामती, 16 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रामार्फत शारदानगर येथे आयोजित ‘कृषिक 2025’ या भव्य कृषी प्रदर्शनाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले आहे. “या कृषी प्रदर्शनात शेती पद्धती आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड असल्यास समृद्धीकडे कृषी क्षेत्राची वाटचाल, या विषयाला धरून उभारण्यात आलेल्या गोष्टींचं सादरीकरण कौतुकास्पद आहे. या प्रदर्शनात लाखो शेतकरी बांधव भेट देतील आणि शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करतील, ही अभिमानाची बाब आहे,” अशा शब्दांत अजित पवारांनी यंदाच्या कृषिक प्रदर्शनाचे कौतुक केले.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1879830388526227765?t=1eFzNFC44WBDD9IshdjNVA&s=19
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1879818117641286125?t=71tFPvjQnGWLb-4DP9iBXQ&s=19
अजित पवारांचे ट्विट
तसेच अजित पवार यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. या प्रदर्शनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित ऊस व्यवस्थापन तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादन क्षेत्रात प्रति एकर 120 टन उत्पन्न मिळवून देणारे प्रात्यक्षिक प्लॉट उभारण्यात आला आहे. नाविन्यपूर्ण फळ झाडांची लागवड, नैसर्गिक शेतीमध्ये देशी भाजीपाला पिकांची प्रात्यक्षिके, रोबोटिक्स आणि यंत्रसामग्रीची प्रात्यक्षिके, शेतकामात होमिओपॅथीचा वापर, अत्याधुनिक डच डेअरी तंत्रज्ञान, पशुदालन तसेच सुधारित पीक तंत्रज्ञानाची 170 एकरवरील प्रात्यक्षिके यांसारख्या कृषी क्षेत्राला विकासाच्या वाटेवर वेगवान करणाऱ्या व शेतकरी बांधवांना समृद्ध करणाऱ्या विविध बाबींचे सादरीकरण प्रदर्शनात करण्यात आले आहे, असे अजित पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पाच दिवस कृषिक प्रदर्शन चालणार
तत्पूर्वी, ‘कृषिक 2025’ या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन सोहळा गुरूवारी (दि.16) पार पडले. या उद्घाटन सोहळा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आणि पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 16 ते 20 जानेवारी दरम्यान हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी, कृषी अधिकारी, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी अजित पवार उपस्थित मान्यवरांसह या कृषी प्रदर्शनाला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी या कृषी प्रदर्शनाची पाहणी करून शेती विषयक उपक्रमांची माहिती घेतली.