बारामती, 31 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन केले जात आहे. या संतप्त मराठा आंदोलकांनी आता अनेक आमदार आणि नेत्यांची बंगले, कार्यालये, गाड्या आणि व्यवसायांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणाबाबत राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट न केल्याने हे आंदोलक संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहेत. याशिवाय राज्यात विविध भागांतील रस्त्यांवर आंदोलकांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील काही ठिकाणी सध्या एस टी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. तर मराठा आंदोलकांच्या या भूमिकेमुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, आक्रमक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरलाही काळे फासले आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली होती. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टर्सवर संताप व्यक्त केला आहे. यावेळी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे संतप्त मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो असलेल्या पोस्टरला काळे फासले. बारामती-निरा रस्त्यावर हा पोस्टर लावण्यात आला होता.
सहा विजयांसह रोहित शर्माने केले ‘हे’ रेकॉर्ड!
तर काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांना बारामती तालुक्यातील मालेगाव येथे येण्यासाठी मराठा समाजाने रोखले होते. त्यानंतर त्यांना आपला दौरा रद्द करावा लागला होता. त्यानंतर आता आक्रमक मराठा समाजाच्या आंदोलकांनी त्यांच्या पोस्टरला काळे फासले आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाने त्यांचे हे आंदोलन आता अधिक तीव्र केल्याचे केल्याचे दिसत आहे. तसेच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत असतानाही सरकार कोणतीही कठोर भूमिका घेत नसल्याने आता मराठा समाज आक्रमक होत असल्याचे बोलले जात आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे- जरांगे पाटील
2 Comments on “मराठा आंदोलकांनी फासले अजित पवारांच्या पोस्टरला काळे!”