बारामती, 28 जानेवारी: महाराष्ट्राला हादरवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज (दि.28) बारामती परिसरात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह एकूण 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
https://x.com/i/status/2016363909725475319

अशी घडली घटना
मुंबईहून बारामतीकडे येणारे छोटे चार्टर्ड विमान लँडिंगदरम्यान अचानक तांत्रिक बिघाडामुळे नियंत्रणाबाहेर गेले. विमानतळाजवळील शेतात ते कोसळले आणि अपघातानंतर काही क्षणांतच विमानाला भीषण आग लागली. आगीमुळे विमान पूर्णपणे जळून खाक झाले.

https://x.com/i/status/2016366933864808967
या विमानात अजित पवार यांच्यासोबत त्यांचे दोन सहाय्यक, पायलट आणि एक होते. अपघात इतका भीषण होता की बचावकार्य तातडीने सुरू करूनही कोणालाही वाचवता आले नाही. या दुर्दैवी घटनेची माहिती कळताच महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली.
आज बारामती दौऱ्यावर होते
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर होते. त्यांच्या बारामती तालुक्यात आज अनेक सभा नियोजित होत्या. ते प्रचारासाठी दौऱ्यावर होते. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे पवार कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लँडिंगदरम्यान झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान या अपघातामुळे एक अनुभवी, रोखठोक, दिलखुलास आणि प्रभावी नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना कार्यकर्ते आणि नागरिक व्यक्त करत आहेत.

