मुंबई, 05 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये अनेक लोकांनी आतपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आईंनी देखील काटेवाडी या गावात मतदान केले. यावेळी त्यांच्या आईंनी म्हटले की, “आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे मला वाटते.” त्यांच्या या विधानावर काही राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान त्यांच्या या विधानावरून शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. अजित पवार यांचे सध्या वय लहान आहे. त्यांना पुढे संधी मिळू शकते, असे ते यावेळी म्हणाले. तसेच मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आणि आकांक्षा कुणाला असण्यामध्ये काही चुकीच नाही. पण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचाच नेतृत्वाखाली आगामी निवडणूक लढवली जाणार आहे, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर येण्याची शक्यता आहे.
वर्ल्डकपमध्ये भारतासमोर आज दक्षिण आफ्रिकेचे आव्हान
यासंदर्भात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या आईंना आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत असल्यास यामध्ये काहीच चुकीचे नाही, परंतु अजित पवारांना त्यांच्या महायुतीमध्ये संधी मिळेल असे वाटत नाही, असे नाना पटोले म्हणाले आहेत. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, कोणत्या आईला तसे वाटणार नाही. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील याविषयी आपले मत व्यक्त केले आहे. मुलाच्या स्वप्नांसाठी त्याच्या आईने प्रार्थना करणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांची प्रार्थना अजित पवार यांच्या स्वप्नांना भरारी देणारी ठरो. अजित पवार यांचे मन परिवर्तन आणि मत परिवर्तन झाले की त्यांचे हे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न नक्की पूर्ण होईल, असे ते यावेळी म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणूक! अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
तसेच अजित पवार यांच्या आईंनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. अजित पवार महाराष्ट्र राज्याचे सक्षम मुख्यमंत्री होऊ शकतात. असे अतुल बेनके यांनी म्हटले आहे.
2 Comments on “मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांचे वय लहान- केसरकर”