बारामती, 15 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (दि.15) बारामती परिसरातील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. यावेळी अजित पवार यांनी बारामतीतील क्रीडा संकुलाच्या बांधकामाची पाहणी केली. तसेच बारामती तालुक्यातील मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम, जळोची येथील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मॅग्नेट प्रकल्प, कन्हेरी इको-टुरिझम प्रकल्प यांसारख्या विकासकामांची पाहणी अजित पवारांनी केली. तसेच त्यांनी यावेळी माळावरची देवी मंदिर परिसरातील नीरा डावा कालव्यावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाची आणि नवीन उद्यानाची पाहणी केली.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1835161306216976748?s=19
बारामती तालुक्यातील मेडद येथे शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सध्या सुरू आहे. या कामाची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी अजित पवारांनी या कामाची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच त्यांनी या कामातील तांत्रिक बाबी जाणून घेऊन हे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बारामतीत येथे सध्या जिल्हा क्रीडा संकुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. या कामाची आणि त्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीची पाहणी आज अजित पवारांनी केली. क्रीडा संकुलात मॅट फिनिशिंग असलेल्या फरशा बसवा. कक्षातील विविध बाबींचा विचार करून इलेक्ट्रिकल उपकरणे वापरावीत. पुरेसा सुर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. तसेच संकुलात येणाऱ्या खेळाडूंना अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टीने कामे करण्याच्या सूचना यावेळी अजित पवार यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1835190315835441260?s=19
तसेच अजित पवार यांनी आज बारामती येथील माळावरची देवी मंदिर परिसरातील नीरा डावा कालव्यावर नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाची आणि नवीन उद्यानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाची जबाबदारी पाहणाऱ्या अधिकाऱ्यांकडून तांत्रिक बाबी जाणून घेतल्या आणि त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना त्यासंदर्भातील सूचना दिल्या. यासोबतच अजित पवार यांनी जळोची उपबाजार येथील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मॅग्नेट प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संपूर्ण परिसराचा आढावा घेतला आणि त्यांनी या कामाच्या संदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1835217644624265235?s=19
बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे इको-टुरिझम प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. या सुरू असलेल्या विकासकामाची अजित पवार यांनी पाहणी केली. यावेळी अजित पवारांनी या कामाबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. हे काम जलदगतीने पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. तसेच ही विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्या. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या.