बारामती, 6 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यात काल 2 हजार 950 गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणकीसाठी मतदान झाले होते. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे आज निकाल लागताना दिसत आहेत. या निवडणूकीत अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक होती. अजित पवार यांच्या काटेवाडी येथील ग्रामपंचायतीची निवडणूक काल पार पडली. या गावात 16 जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून काटेवाडी ग्रामपंचायतीची सत्ता अजित पवार गटाकडे होती.
शरद पवारांनी घेतली एकनाथ खडसे यांची भेट; केली प्रकृतीची विचारपूस
या निवडणूकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी विरोधात भारतीय जनता पक्षाने आपला पॅनल उभा केला होता. यावेळी अजित पवार गटाने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. या निवडणूकीत त्यांनी 16 पैकी 14 जागा जिंकल्या आहेत. तर त्यांना मात्र 2 जागेवर पराभव पत्करावा लागला. या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने काटेवाडी मध्ये प्रथमच जागा जिंकल्या आहेत. भाजपने काटेवाडीत 2 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला एकहाती सत्ता मिळवण्यात अपयश आले आहे. दरम्यान ही निवडणूक जाहीर झाल्यापासून काटेवाडी गावातील निवडणुकीची सर्वत्र चर्चा रंगली होती. या निवडणूकीत अजित पवार गट निवडून येणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या निवडणूकीत 14 जागा जिंकल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. सध्या या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष केला जात आहे.
सदावर्तेंनी पुकारलेल्या संपाला एसटी कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद नाही
तर या निवडणुकीच्या आधी अजित पवार गटाने काटेवाडी गावात पैसे वाटले असल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र त्यांचे हे आरोप अजित पवार गटाने फेटाळून लावले होते. दरम्यान, कालच्या दिवशी बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. या निवडणूकीत अजित पवार गटाने 29 जागांवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पक्षाला 2 जागा जिंकता आल्या. त्यामुळे बारामती तालुक्यात अजित पवार यांची ताकद जास्त असल्याचे या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येते.
One Comment on “काटेवाडीत अजित पवार गटाने मारली बाजी”