बारामती, 19 जूनः नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने SSC चा निकाल जाहीर केला. या निकालात बारामती शहरासह परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या कष्टाने इयत्ता दहावीत चांगले मार्क मिळविले. यामुळे बारामती शहरात विविध ठिकाणी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यसाठी मोठ मोठे बॅनर लावण्यात आले. मात्र शहराचे विद्रुपीकरण होत आहे, या कारणास्तव सदर बॅनरवर कारवाई करून ते काढण्यात आले.
बारामती नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मात्र काल, 18 जून 2023 रोजी संत तुकोबा महाराजांची पालखीचे मोठ्या जल्लोषात बारामती शहरात स्वागत झाले. विशेष म्हणजे यंदा राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी संत तुकोबांच्या पालखीला ओढणाऱ्या बैलगाडीवर बसून बारामती परिसरात आणली. हा नजरा बारामतीकरांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.
बारामतीच्या आमराईत बसवण्यात येणारे ट्रान्सफॉर्मर इतरत्र हलवा; अन्यथा तीव्र आंदोलन करू- रविंद्र सोनवणे
हे सर्व ठिक असताना सर्वसामान्यांच्या मनात एक गोष्ट खटक होती. ती म्हणजे इतरांनी लावलेले बॅनर हे बारामती शहराचे विद्रुपीकरण करणारे असतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होते. मात्र दुसरीकडे बारामती शहरातील क्रीडा संकुल जवळ देसाई इस्टेटकडे जाणाऱ्या रोडच्या शेजारी चक्क अजित पवार यांना विठ्ठलाच्या रुपात दाखवल्याचे बॅनर झळकत आहेत.
बारामतीकरांसाठी अजित पवारांचे हे रुप नजर लागण्यासारखे आहे. मात्र एकीकडे उत्तम गुण मिळवून बारामतीचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभिनंदन करणारे बॅनरवर कारवाई करत ते उतविले जातात, तर दुसरीकडे मात्र अजित पवारांना विठ्ठलचे रुप देऊन गेल्या काही दिवसांपासून बॅनर झळकवले जातात. मात्र याकडे बारामती नगरपरिषदेचे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. हे सर्व म्हणजे मांजरीने डोळे झाकून दूध पिल्यासारखे झाले. म्हणजे आपल्याला कोणी बघतच नाही, असाच प्रकार झाल्याचं दिसत आहे.
एक दिवसाच्या मुक्कामानंतर संत तुकोबांची पालखी आज, 19 जून 2023 रोजी सकाळी पुढच्या मुक्कामाकडे निघाली आहे. मात्र अजूनही बारामती नगरपरिषदेने अजित पवारांचे विठ्ठल रुपी बॅनर अजूनही काढलेले नाहीत. यावरून अजित पवार आणि बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी आता शहराचे विद्रुपीकरण झालेले दिसत नाही का? असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. सदर बॅनरवर कारवाई होणार का? हा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.
आश्वासनानंतर धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित