अजित दादांच्या आदेशाला कचऱ्याची टोकरी?

दिल्ली, 15 मे: (अभिजित कांबळे) बारामती मध्ये काल (दि.14) मयत महादेव रामा चव्हाण यांचा मृतदेह वाहत असलेल्या कॅनलमध्ये सापडला. याबाबत बारामती शहर पोलीस स्टेशन इसम यांना हरवल्या बद्दल कुटुंबीयांनी फिर्याद दाखल केली होती. गेले पंधरा दिवस याबाबत तपासी यंत्रणा तपास करीत होते. परंतु, दुर्दैवाने आज त्याचा मृतदेह कॅनल मध्ये सापडला हा मृत्यू अपघाती? की घातपात? याबद्दल आमराई परिसरात उलट सुलट चर्चा चालू आहे.



त्याच्या उद्योगधंद्याबद्दल अनेक प्रचार व अप्रचारत्मक चर्चा चालू आहे. त्याला असलेले शोक, त्याच्या कमाईचे मार्ग व गमवायचे मार्ग याबद्दल त्याच्याजवळची मित्र, नातेवाईक वेगळीच कहाणी कथन करीत आहे. कोण म्हणतंय तो मटका चालवायचा की खेळायचा, कोण म्हणतंय तो काजळे नामक मटका व्यवसायिकाचे तांदुळवाडीतील मटका एजंट चे त्याच्यावर उधारी मटका खेळण्याबाबतचे कर्ज झाल्याची अफवा ही आमराई परिसरात पसरली आहे. या आर्थिक वेदने पायी तो दारूचे सेवन करीत असे. कारण काही ही असो, पण एक तरुण आज मटक्या मुळे आपल्यात नाही हे पण निश्चितच.



मटका वाल्याने त्याचा घातपात तर केला नसेल? किंवा त्याच्या भीतीने त्याने आत्मघात तर केला नसेल? पण हे सारे प्रकरण मटक्याच्या पैशाच्या देवाणघेवाणेतुनच झाले असल्याची चर्चा मटका व्यवसाय संबंधित लोकांमध्ये निश्चित आहे.



एकेकाळी मटका व्यवसायात अधिराज्य गाजवणारा बारामती मध्ये एक हाती मटक्याची सत्ता चालवणारा मयत नाना यांची हत्या मटका युद्धातूनच झाली, ही गोष्ट बारामतीकर विसरली नाहीत. तर या हत्याचा बदला म्हणून एका युवतीची हत्या पूर्वीचे सांस्कृतिक केंद्र येथे दिवसा ढवळ्या झाली. जामदार रोडला मटक्याच्या उधारीच्या वसुलीवरून एक दांपत्याची निर्घृण हत्या केल्याचे बारामती करांना त्याचे पदोपदी स्मरण होताना दिसतात.

माननीय अजित दादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे बारामती तालुक्यात उत्तम, सर्वश्रेष्ठ, निर्दोष कसलाही डाग नसलेला अधिकारी आणत असतात. दादांच्या विरुद्ध बारामती मध्ये एक शिपाई रुजू होऊ शकत नाही, हे महाराष्ट्रभर सर्व प्रसिद्ध आहे. अशा कुशल व दक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांना बारामती मध्ये मटका चालक-मालक, नोकर हे तोंड पाठ असलेच पाहिजे व ते असणारच.

असे असताना बारामतीतील पोलिसांनी त्यांचे पेरलेले गुप्तहेर खबरी याचे मोठे जाळे आहेत. या मटका व्यवसायातूनच पुढील शब्द प्रयोग इंटेलेक्चर फेलियर माहितीचा अभाव असू शकत नाही, असे असतानाही बारामती मध्ये होऊ घातलेल्या व निर्माण होत असणारे गुन्हेगारी टोळ्या ज्या बारामतीमध्ये शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहे आणि गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. ही सामाजिक जाणीव व मानसिकता पोलीस खात्याला कळत नाही असे होऊ शकत नाही.

त्यांच्या खबऱ्याकडून विशेष पथकाकडून सामाजिक शाखेकडून बारामतीमध्ये अशांतता निर्माण होत आहे. याची पूर्ण जाणीव बारामती शहराच्या व बारामती तालुक्याच्या पोलिसांना माहित आहे. याबद्दलचा गोपनीय अहवाल बारामतीच्या गुप्त विभागाने अजित पवार यांना नक्कीच दिला असेल आणि ही परिस्थिती सुधारण्यासाठी इथली यंत्रणा कार्यरत असेल. पण, त्यांचे परिणाम बारामतीकरांना दादा कधी दिसणार? हा मूलभूत प्रश्न आहे. बारामतीतील औद्योगिक क्षेत्र निम्म्यावर आलय. बारामतीतील शैक्षणिक क्षेत्र असुरक्षितेच्या छायेत आहे. वैद्यकीय व्यवसाय तेजीत आहे. पण असेच असुरक्षितेचे वातावरण राहिले तर बारामतीचा विकास कसा होणार.

माननीय अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची प्रशासकीय पकड बारामतीत व बारामतीच्या प्रशासनावर ढिल्ली झाली आहे, असे नव्हे तर संपलीच आहे हे मटका युद्धातून सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *