हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले; 2 वैमानिक ठार

दिंडीगुल, 04 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) तेलंगणातील दिंडीगुल येथील भारतीय हवाई दलाच्या अकादमीमध्ये प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात 2 वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली. तर हे विमान या अपघातानंतर काही मिनिटांतच जळून खाक झाले आहे. तर ह्या अपघातात या व्यतिरिक्त कोणत्याही नागरिकाला इजा झाली नाही. मात्र भारतीय हवाई दलाच्या विमानात किती लोक होते? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

दरम्यान या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने या अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार, या अपघाताच्या वेळी विमानात एक प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक उपस्थित होते. त्यावेळी हे विमान कोसळले. या घटनेत हे दोन्ही वैमानिक मारले गेले. तर या व्यतिरिक्त कोणत्याही नागरिकांच्या जीविताचे किंवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नाही, असे हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

अधिवेशनात पराभवाचा राग धरू नका, मोदींचा विरोधकांना टोला

तत्पूर्वी, दिंडीगुल विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले. हा अपघात झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या विमानाला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत या विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या भारतीय हवाई दल या अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या अपघाताचा तपास केल्यानंतरच याबाबत अधिक माहिती मिळणार असल्याचे हवाई दलाने म्हटले आहे.

पाचव्या टी-20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

दरम्यान, या दुर्घटनेनंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वैमानिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. “हैदराबादजवळ झालेल्या या अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे. दोन वैमानिकांना आपला जीव गमवावा लागला हे अतिशय दुःखद आहे. या दु:खद प्रसंगी माझे विचार शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत.” असे ते या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

One Comment on “हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले; 2 वैमानिक ठार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *