अहमदाबाद, 11 जून: (विश्वजित खाटमोडे) गुजरातच्या अहमदाबाद शहरात गुरूवारी (दि.12) दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. अहमदाबाद मध्ये एअर इंडिया कंपनीच्या बोइंग 787 ड्रीमलायनर या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. परंतु, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
https://x.com/PTI_News/status/1933133019604189619?t=4x-5gdQq-NmQyRbzQexvnw&s=19
242 प्रवासी विमानात होते
दरम्यान, या अपघातावेळी विमानात 242 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. या अपघातामुळे जगभरात शोक व्यक्त करण्यात येत आहेत. हे विमान आज अहमदाबादहून लंडन गॅटविकला जात असताना ते दुर्दैवाने अहमदाबादमध्ये कोसळले.
बचावकार्य सुरू
या अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहा आणि बीएसएफच्या दोन पथकांना पाठवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
https://x.com/AHindinews/status/1933144933734441322?t=dny5DrB177C1BliViXRakw&s=19
25 जखमींची यादी जाहीर
दरम्यान, अहमदाबाद पोलिसांनी या दुर्घटनेत जखमी झालेल्या 25 जणांची यादी जाहीर केली आहे. गुजरात राज्य आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी सांगितले की, “अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह, कर्मचारी निवास आणि इतर निवासी भाग या अपघाताच्या ठिकाणाच्या जवळ आहेत. दुर्घटनेनंतर अंदाजे 50 जखमींना अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.” या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, प्रशासनाने तपास सुरू केला आहे. अधिकृत तपास अहवालाची प्रतीक्षा आहे.