अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे आमदार पडळकरांच्या हस्ते अनावरण

बारामती, 6 जुलैः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील जोगवडी गावामध्ये नुकताच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

मयुरेश्वर आयटीआयच्या 40 विद्यार्थ्यांची महिंद्रा कंपनीत निवड

दरम्यान, गेली सहा महिन्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला झाकून ठेवण्यात आले होते. काही गावातील लोकांमुळे उत्तराच्या अनावरण अडथळा येत होता. तरी फेब्रुवारीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर हे मोहाळे या गावांमध्ये आले असताना जोगोळी गावातील सरपंच प्रभुवांवर व तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश महानोर यांच्यासह भाजपचे बारामती तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कळमकर, बारामती तालुका सरचिटणीस बाळासाहेब बालगुडे यांनी या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याकडे एक निवेदन दिले होते.

जखमी मोराला भोसले परिवारांकडून जीवदान

याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, बारामती तालुका विधानसभेचे अध्यक्ष रंजन तावरे, जोगवडी गावचे सरपंच प्रभू मानवर, बापूराव सोनकर, बाळासाहेब बालगुडे, बाळासाहेब गुळूमकर, मंगेश खताळ आदी मान्यवर उपस्थित होते.

One Comment on “अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे आमदार पडळकरांच्या हस्ते अनावरण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *