बारामतीत कृषी व उद्योजकता विकास प्रशिक्षण संपन्न

बारामती, 27 डिसेंबरः बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात एकात्मिक कृषी आणि उद्योजकता विकास प्रशिक्षण वर्ग 21 ते 26 डिसेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाचे आयोजन अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित कृषी विज्ञान केंद्र , बारामती व आय. सी. आय. सी. आय. फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणात मुक्त संचार गोठा पद्धती, मुरघास तंत्रज्ञान, आधुनिक चारा लागवड तंत्रज्ञान, स्वच्छ दूध उत्पादन तंत्रज्ञान व दुध प्रक्रिया, विविध शासकीय योजना, गाई मध्ये गर्भ प्रत्यारोपण तंत्रज्ञान, शेळी पालन व्यवस्थापण, बायोफ्लोक व अ‍ॅक्वाफोनिक मत्स्य पालन या विषयावर कृषी विज्ञान केंद्र, बारामती पशुसंवर्धन विभागाचे विशेष विशेतज्ञ डॉ. रतन जाधव यांनी मागदर्शन केले.

माळेगावातून दोन गावठी पिस्टल हस्तगत; एकाला अटक!

सदर प्रशिक्षणात अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे ट्रस्टी विष्णुपंत हिंगणे यांनी केंद्रात असलेल्या विविध विभागाबद्दल सखोल माहिती दिली. तसेच केंद्राचे महेश जाधव यांनी सूक्ष्म सिंचन प्रणाली व सघन पद्धतीने आंबा, पेरू लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच कलमी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर केंद्रातील विशेष विशेतज्ञ उद्यानविद्या विभागाचे यशवंत जगदाळे यांनी सखोल मार्गदर्शन केले. यासह हरित ग्रहातील पिक व्यवस्थापन या बाबत विजय मदने यांनी मार्गदर्शन केले.

मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी विनोद गोलांडे यांची निवड.

केंद्रातील विशेष विशेतज्ञ संतोष करंजे यांनी मानवी आहारातील भरड धान्याचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. जैविक खते-औषधे व पीक उत्पादन वाढीसाठी मधमाशी पासून होणारा फायदा या विषयावर अल्पेश वाघ यांनी मार्गदर्शन केले. सेंटर ऑफ ऍक्सेलन्स फॉर डेअरी येथील विजय मुंडे यांनी मुक्तसंचार गोठा पद्धती या विषयावर मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ ऍक्सेलन्स डेअरी माळेगाव येथे प्रशिक्षणार्थी सोबत घेऊन भेट दिली. कार्यक्रम दरम्यान आय. सी. आय. सी. आय. फौंडेशनचे अनुज अग्रवाल यांनी प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी आय. सी. आय. सी. आय. फौंडेशनचे 34 फेलोशिप विद्यार्थी व अधिकारी प्रशिक्षणास उपस्थित होते.

One Comment on “बारामतीत कृषी व उद्योजकता विकास प्रशिक्षण संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *