बारामती/ माळेगाव, 17 जानेवारीः अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,कृषि विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीने मागील आठ वर्षांपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे आठवे वर्ष असून दिनांक 18 ते 22 जानेवारी दरम्यान “कृषिक २०२४” हे कृषी प्रदर्शन सुरू राहणार आहे. यंदाचे कृषी प्रदर्शन हे भविष्यातील शेती ही संकल्पना घेऊन आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी दिली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.निलेश नलावडे उपस्थित होते.
कृषीक-2024 मध्ये जागतिक स्तरावरील प्रात्यक्षिके
शेतकऱ्यांचे हित नजरेसमोर ठेवून राज्यभरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्याबरोबरच शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने “कृषिक” कृषी प्रदर्शन दरवर्षी भरवले जाते.
पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन कसे मिळवता येईल यासाठी हे प्रदर्शन शेतकऱ्यांना उपयोगी ठरत आहे. या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत बदल करत अधिकचे उत्पादन मिळवले आहे.
वंचितच्या शाखेचे जळगाव सुपे गावात उद्घाटन
दरवर्षी या कृषीक कृषी प्रदर्शनाला राज्यभरातील लाखो शेतकरी भेट देत असतात. या प्रदर्शनादरम्यान शेती उपयोगी अत्याधुनिक तंत्रज्ञान यासंबंधी शेतकऱ्यांना माहिती दिली जाते तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबाबतचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येते. या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.