आंदोलन मागे घेतल्यानंतर एसटी बस सुरू

जालना, 03 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री त्यांचे आमरण उपोषण मागे घेतले आहे. तत्पूर्वी काल उपोषण सोडण्याच्या आधी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षण संदर्भात निर्णय घेण्यासाठी 2 जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. त्यांनतरच त्यांनी हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र तोवर साखळी उपोषण सुरुच राहणार आहे, असे जरांगे पाटलांनी म्हटले आहे. त्यानंतर, राज्यातील गावागावांत मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणारे आंदोलने आणि उपोषण आता मागे घेण्यात आले.

शिष्टमंडळाला मोठे यश, जरांगे पाटलांनी उपोषण घेतले मागे

दरम्यान या आंदोलनाच्या काळात काही ठिकाणी प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद केली होती. ती इंटरनेट सेवा देखील आज सुरू करण्यात आली आहे. याशिवाय, मराठा आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक स्वरूप प्राप्त झाले होते. त्यावेळी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, राज्यात अनेक ठिकाणी एसटी महामंडळाने त्यांच्या बसेसच्या फेऱ्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घेतल्यामुळे आता एसटी बस पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार, आज एसटी बस पुन्हा एकदा रस्त्यावर धावताना दिसत आहे. आता सणासुदीच्या काळात एसटी बस पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

भारताचा श्रीलंकेवर 302 धावांनी विजय

त्पूर्वी, गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणात आंदोलने केली जात होती. या आंदोलनात संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी काही ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ देखील केली. यामध्ये काही नेत्यांची घरे आणि गाड्या जाळण्यात आल्या. तसेच अनेक नेत्यांच्या गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आली. यासोबतच एसटी बसेसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. त्यानुसार, राज्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही मराठा आंदोलकांना देखील अटक केली होती.

राज्यभर तीव्र होत चाललेले आंदोलन पाहून, राज्य सरकारने त्यांचे एक शिष्टमंडळ काल जरांगे पाटील यांच्या भेटीला पाठवले. त्यावेळी या शिष्टमंडळाने जरांगे यांच्याशी मराठा आरक्षण संदर्भात बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षण लागू करण्यासाठी 2 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला आणि त्यांचे उपोषण मागे घेतले. त्यामुळे जरांगे पाटील यांचे या शिष्टमंडळाने आभार मानले. त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली. यासोबतच त्यांनी मनोज जरांगे यांचे उपोषण सोडल्याबद्दल आभार मानले. कायदेतज्ञ एखादे उपोषण सोडवण्यासाठी प्रत्यक्ष उपोषण स्थळी जाणे ही इतिहासातली पहिला घटना असेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. दोन महिन्यांची मुदत जरांगे पाटील यांनी दिली आहे. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन गांभीर्याने पाऊल टाकेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *