संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यानंतर बानप ने घेतली स्वच्छतेची जबाबदारी

बारामती, 20 जूनः (प्रतिनिधी- अभिजीत कांबळे) संत श्रेष्ठ तुकोबा महाराज यांच्या पालखीचे स्वागत 18 जून 2023 रोजी बारामतीमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखीचा मुक्काम बारामती शहरातील शारदा प्रागण येथे होता. पालखीच्या प्रस्थानानंतर बारामती नगरपरिषदेने शहरात तत्काळ स्वच्छतेची मोहीम हातात घेतली.

संत सोपान काका महाराज पालखीचे कोऱ्हाळे गावात भक्तीमय वातावरणात स्वागत

या मोहीमेत परिषदेचे कर्मचाऱ्यांनी शारदा प्रागण, यासह शहरातील विविध भागात स्वच्छता केली. यासह पालखीचे प्रस्थान इंदापूरकडे होत असताना बारामतीमधील अनेक सेवा करणाऱ्यांनी चहा, नाश्ता तसेच फळांची व्यवस्था केली होती. यामध्ये आमराई विभागामधील ओंकार (बंटी) माने यांनी वारकऱ्यांसाठी बिस्कीटांचे वाटप केले. कुंडलिक जगताप व सोनू राठोड यांनी चहा वाटप केला. तर माजी नगरसेवक अप्पा अहिवळे यांनी पाणीचे वाटप केले. या वाटपात दयावान दामोदर, अभिजीत कांबळे, शुभम कांबळे, समाधान लोंढे. अनिकेत अहिवळे, आशिष भोसले, लखन चव्हाण, सुशील कांबळे, गणेश जाधव, शुभम रणदिवे, संकेत सदाफुले, सम्राट गायकवाड आदींनी मदत केली.

एक हात मदतीचा…

तसेच सिद्धार्थ नगर येथे फळ वाटप व नाश्त्याची व्यवस्था किरण अहिवळे, भाविन सोनवणे, नितीन सोनवणे, रूपाली सोनवणे, प्रियांका घोडके आदींनी केली. यावेळी वारकऱ्यांना चहा, नाश्ता व फळांचे वाटप केले.

पालखी सोहळ्यासाठी बारामती नगरपरिषद प्रशासनाने यंदाही सुनियोजित तयारी करण्यात आली होती. शहरातील निरा डावा कालव्याजवळ सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली होती. बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांच्या निवासाची व अंघोळीची चोख व्यवस्था आरोग्य अधिकारी आदित्य बनकर, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे व अजय लालबिगे यांनी पाहिली.

अजित पवार आणि बारामती नगरपरिषदेकडून विद्रुपीकरण कारवाईत दुजाभाव!

पालिकेचे प्रस्थान जसे जसे होत होते, तसे तसे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान हाती घेतल्यामुळे बारामती ‘स्वच्छ व सुंदर’ झाल्याचे चित्र दिसत होते. यामध्ये अनेक सफाई महिला कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी वारकऱ्यांबरोबर पारंपारिक खेळ खेळण्यास सांगितले. यात झिम्मा, फुगडी खेळ खेळतानाही काही महिला कर्मचारी दिसल्या.

One Comment on “संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यानंतर बानप ने घेतली स्वच्छतेची जबाबदारी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *