बारामती, 28 ऑक्टोबरः भावाच्या निधनामुळे मानसिक धक्का बसून बहिणीचीही प्राणज्योत विझल्याची घटना नुकतीच बारामती तालुक्यातील मुर्टी येथे घडली. बाळासाहेब शेलार यांच्या मृत्यूनंतर अवघ्या पंधरा दिवसांनी त्यांची बहिण शशिकला तावरे यांचं निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बारामतीत भीषण अपघात; माय लेकरासह पादचारी ठार
मुर्टी येथील बाळासाहेब बबन शेलार यांचं 8 ऑक्टोबर 2022 रोजी अल्पशा आजाराने निधन झालं. याचाच धक्का बसून त्यांची थोरली बहिण शशिकला दत्तात्रेय तावरे यांचं 23 ऑक्टोबर 2022 रोजी निधन झालं. भावाच्या मृत्युनंतर अवघ्या पंधराच दिवसात मानसिक धक्क्याने निधन झाल्याने चिरेखानवाडीसह मुर्टी पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.
पीक विमा योजनेत सहभाग घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरेखानवाडीमध्ये शशिकला तावरे या मध्यान्ह भोजन बनवत होत्या. शशिकला तावरे यांच्या मागे पती दत्तात्रेय तावरे, मुलगा संतोष तावरे, मुलगी श्रीलता तावरे, दीर, त्यांच्या जावा असा मोठा परीवार आहे.
One Comment on “भावाच्या निधनानंतर बहिणीनेही सोडलं प्राण”