बारामती, 2 नोव्हेंबरः(अभिजीत कांबळे) बारामती कृषि बाजार समितीत आज, 2 नोव्हेंबर 2022 रोजी पुन्हा कापसाचा लिलाव पार पडला. कृषि बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये आज, बुधवारी झालेल्या कापूस लिलावात कापसाला क्विंटल 8901 रुपयांचा दर मिळाला. या लिलावात शेतकरी राजेंद्र मदने यांच्या कापसाला 8901 रुपयांची सर्वाधिक बोली लावण्यात आली. कापसाला साधारणतः सरासरी 7500 रुपये भाव मिळेल. मार्केट यार्डमध्ये आज तब्बल 30 क्विंटल कापसू आला आहे.
इंदापुरात सीताफळ शेतीकडे वाढला कल
बारामतीमध्ये 1988 नंतर पहिल्यांदाच कापसाचा लिलाव झाला आहे. व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष जवाहर वाघोलीकर, कृषि बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप, प्रशासक मिलिंद टांगसाळे यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले. कापूस लिलावासाठी कृषी बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप, अमोल वाडीकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. सदर लिलावात शिवाजी फाळके, बाळासाहेब फराटे, केशवराव मचाले, उमेश सोनवणे, कल्पेश सोनवणे या व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.
कृषी बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी ‘भारतीय नायक’शी बोलताना सांगितले की, बारामती तालुक्यासह आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी कापूस उत्पादन प्रोत्साहन देण्यासाठी 50 टक्के बियाणे शेतकऱ्यांना कृषि बाजार समिती उपलब्ध करून देणार आहेत. तसेच कॅश क्रोप कापूस हे कॅश क्रॉप पीक आहे. हे पिक प्रत्येक 5 महिन्यात येणारे पीक आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जे काही करता येईल, ते बारामती कृषी बाजार समिती नेहमी करेल, असे जगताप म्हणाले.
या आधी कापूस विक्रीसाठी विदर्भ आणि मराठवाड्यात विक्रीसाठी जायचा. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दूरवर वाहतूक करून आर्थिक फटका बसत असे. तर कधी कधी कापूस पावसात खराब होण्याची दाट शक्यता असायची. परंतु बारामती कृषी बाजार समितीमध्ये कापूस विक्रीला चांगले दर मिळाले आहेत. आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी मार्केट यार्डमध्ये कापसाचा लिलाव सुरू होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळावा, यासाठी कृषी बाजार समिती नेहमी प्रयत्न करणार असल्याचे अरविंद जगताप यांनी सांगितले आहे.
गुणवडीत अवैध दारू विक्रेत्यावर सेशन कमिट गुन्हा दाखल
One Comment on “बारामतीत 1988 नंतर पुन्हा कापसाचा लिलाव सुरु”