आफ्रिकेचे इंग्लंडसमोर 400 धावांचे लक्ष्य!

मुंबई, 21 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना खेळविण्यात येत आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने फलंदाजी करताना 50 षटकांत 7 गडी गमावून 399 धावा केल्या.

विनायक मेटेंच्या पुतण्याची आत्महत्या

यामध्ये दक्षिण आफ्रिका संघातर्फे हेनरिक क्लासेनने 67 चेंडूत 107 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या खेळीत 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. सोबतच मार्को जेन्सेनने 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 42 चेंडूत 75 धावांचा तडाका लावला. यावेळी रीझा हेंड्रिक्सनेही 85 धावांचे योगदान दिले. तर गोलंदाजीत इंग्लंड तर्फे आर. टोप्ली याने आफ्रिकेचे 3 गडी बाद केले.

या सामन्यात आफ्रिकेच्या 36.3 षटकांत 5 बाद 243 धावा होत्या. त्यावेळी आफ्रिकेचा संघ काहीसा अडचणीत सापडला होता. मात्र त्याच वेळी आलेल्या मार्को जेन्सेनने सामन्याचे चित्र फिरवत 75 धावांची खेळी धडाकेबाज केली. त्यानंतर मार्को जेन्सेन आणि हेनरिक क्लासेन यांनी 151 धावांची भागीदारी करून आफ्रिकेला बलाढ्य स्थितीत पोहचवले. त्यामुळे आता इंग्लंड संघ या 400 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करेल का? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

मुदतीत कर भरलेल्या नागरिकांना बक्षिसांचे वितरण

One Comment on “आफ्रिकेचे इंग्लंडसमोर 400 धावांचे लक्ष्य!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *