मुंबई, 21 ऑक्टोबर: ( विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज (दि.21) दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा तब्बल 229 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने इंग्लंडसमोर विजयासाठी 400 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र या बलाढ्य धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 22 षटकांत 170 धावांतच संपुष्टात आला. वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडचा हा सर्वात मोठा पराभव आहे. याआधी 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 221 धावांनी पराभव केला होता.
आफ्रिकेचे इंग्लंडसमोर 400 धावांचे लक्ष्य!
वर्ल्डकप मधील इंग्लंडचा हा दुसरा मोठा पराभव आहे. तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम आफ्रिकच्या फलंदाजांनी आपली जादू दाखवत 400 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी ही चमकदार कामगिरी केली. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. तर इंग्लंड संघासाठी वेगवान गोलंदाज मार्कवुडने 10 व्या क्रमांकावर येऊन 43 धावांची सर्वाधिक नाबाद खेळी खेळली. याशिवाय त्यांच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही.
विनायक मेटेंच्या पुतण्याची आत्महत्या
तत्पूर्वी या सामन्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांतर्फे हेनरिक क्लासेनचे झंझावाती शतक आणि मार्को जॅनसेनचे अर्धशतक यामुळे त्यांना 399 धावांपर्यंत मजल मारता आली. मार्को जॅनसेनने वनडेत प्रथमच अर्धशतक झळकावले. त्याने 42 चेंडूत 75 धावांची नाबाद खेळी खेळली. सोबतच हेनरिक क्लासेनने 61 चेंडूत शतक झळकावले. विश्वचषक 2023 मधील हे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. या कामगिरीमुळे क्लासेनला प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, या पराभवामुळे आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत चांगल्या नेट रनरेटने तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे मात्र पराभवामुळे इंग्लंडची या स्पर्धेतील वाट खडतर झाली आहे. गुणतालिकेत सध्या इंग्लंडचा संघ नवव्या स्थानावर आहे.
One Comment on “आफ्रिकेचा इंग्लंडवर 229 धावांनी विजय”