दौंड तालुक्यातून भेसळयुक्त गूळ आणि साखर जप्त

दौंड, 8 ऑगस्टः दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळांवर आज, 8 ऑगस्ट 2022 रोजी अन्न व औषध प्रशासनाने धाडी टाकली आहे. या कारवाईत 2,19,600 रुपये किंमतीचा सुमारे 7313 किलो भेसळयुक्त गूळ तर 83,440 रुपये किंमतीची 2,750 किलो भेसळयुक्त साखर जप्त करण्यात आली आहे.

दौंडमध्ये खासगी सावकारांवर कारवाई

अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने चॉकलेट, भेसळयुक्त गुळ व साखर वापरणाऱ्या गूळ उत्पादकावर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, जानेवारी 2022 मध्ये दोन गुळ उत्पादकावर धाडी टाकुन 3,67,900 रुपये किंमतीचा सुमारे 7,162किलो गुळाचा साठा जप्त केला होता. फेब्रुवारी 2022 मध्ये हातवळण येथील गूळ उत्पादकावर धाडी टाकुन गूळ आणि भेसळीसाठी वापरली जाणारी साखर जप्त केली होती. या प्रकरणी खटला दाखल करण्याची कारवाई सुरु केली आहे. सदर कारवाईत जप्त केलेली साखर अन्न व औषध प्रशासनाने नष्ट करण्यात आली आहे.

बारामतीत बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

दरम्यान, भेसळीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहे. यामुळे प्रशासनाकडून लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या प्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 या कायद्यांतर्गत आवश्यक असलेला परवाना घेऊनच गुळ उत्पादन करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *