बारामती, 7 ऑक्टोबरः दिवाळी उत्सवासाठी बारामती उपविभागात शोभेची दारू व फटाके विक्रीचे परवाने उपविभागीय दंडाधिकारी बारामती यांच्या कार्यालयाकडून देण्यात येणार आहेत.
बारामती उपविभागात ज्यांना फटाका विक्रीचे परवाने हवे आहेत, त्यांनी साध्या कागदावर 17 ऑक्टोबर 2022 पूर्वी अर्ज करावेत. तसेच 17 ऑक्टोबर 2022 नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जास 10 रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे. ज्या जागेत व्यवसाय करावयाचा आहे, त्या जागेचा मिळकत रजिस्टरचा उतारा अथवा सदर जागा दुसऱ्याची असल्यास त्या जागेचा वापर करण्यास संबंधिताचे स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र तसेच जागा सुरक्षिततेबाबत अर्जदारांचे 100 रुपयाच्या स्टॅम्पसवर प्रतिज्ञापत्र सांक्षाकित करून देणे गरजेचे आहे.
बारामतीत कलम 33 (1) लागू
पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक यांचा शोभेची दारू व फटाके साठा, विक्रीची सुरक्षिता आणि दंड व शिक्षा झाली आहे किंवा कसे याबाबतचे प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसायाची जागा सुरक्षित असल्यातबाबतचे प्रतिज्ञापत्र, ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र, नगरपालिका हद्दीतील स्टॉलबाबत नगरपालिकेचे दुकानासाठी जागा दिल्याच्या पत्राची प्रत, मागील वर्षाच्या परवान्याची झेरॉक्स प्रत, अर्जासोबत परवाना फी 600 रुपये महसूल आणि वन विभाग व 0070 इतर प्रशासकीय सेवा, संगणक संकेतांक 0070991 या लेखा शिर्षाखाली शासकीय कोषागारात जमा करून त्याचे मूळ चलन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
वर्धापण दिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप
शोभेची दारू व फटाके विक्रीची मुदत 27 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. परवान्यातची मुदत संपल्यारनंतर परवाना धारकांनी शिल्लक राहिलेला माल जवळ ठेवू नये. शिल्लक राहिलेला माल कायम स्वरूपाचा परवाना असलेल्या परवाना धारकांजवळ ठेवणे आवश्यक आहे, असे उपविभागीय दंडाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी कळविले आहे.