मुंबई, 07 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांची आता दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणात शिंदे सरकार एसआयटी स्थापन करण्याची शक्यता आहे. दिशा सालियान ही बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी मॅनेजर होती.
शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करा; विरोधकांची राज्य सरकारकडे मागणी
दरम्यान दिशा सालियन हिचा वयाच्या 28 व्या वर्षी जून 2020 मध्ये मुंबईतील इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला होता. तर तिच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूतने त्याच्या मुंबईतील घरी गळफास घेऊन घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर दिशा सालियान मृत्यूप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप केले होते. तसेच सत्ताधारी पक्षांकडून देखील आदित्य ठाकरे यांच्या विरोधात याप्रकरणी आरोप करण्यात आले होते.
तुळजाभवानी देवीचे दागिने गहाळ झाल्याने खळबळ
त्यानंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा सीबीआय तर्फे तपास करण्यात आला होता. दिशा सालियनचा मृत्यू इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला होता. त्या दिवशी ती दारूच्या नशेत होती, असे सीबीआयने त्यांच्या अहवालात म्हटले होते. तसेच याप्रकरणात त्यांनी कोणालाच दोषी मानले नव्हते. त्यानंतर देखील आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधक सातत्याने आरोप करीत आहेत. तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे झालेल्या गेल्या हिवाळी अधिवेशनात एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणी चौकशी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.