मंडी, 14 मे: (विश्वजीत खाटमोडे) अभिनेत्री कंगना राणौत हिने आज लोकसभा निवडणुकीसाठी हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी कंगनासोबत तिची आई, बहीण यांच्यासह हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर उपस्थित होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी मंडी मतदारसंघात 1 जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. कंगनाला या मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. या जागेवर भाजपच्या कंगना राणौतचा सामना काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांच्याशी होणार आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1790286050352418840?s=19
https://twitter.com/AHindinews/status/1790269704700924196?s=19
https://twitter.com/AHindinews/status/1790279397519356335?s=19
कंगनाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी
मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना राणौतने उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रोड शो केला. यावेळी कंगनाला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी कंगना राणौत हिने माध्यमांशी संवाद साधला. “आज मी मंडईतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे प्रत्येकजण आज खूप उत्साहित आहे. मंडीच्या एका मुलीला ही संधी मिळाली हे माझ्यासाठी खूप भाग्यवान आहे. लोक खूप उत्साहात आहेत आणि वातावरण एखाद्या उत्सवासारखे आहे. हा ऐतिहासिक विजय असेल, असे कंगनाने म्हटले आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1790266749176205748?s=19
लोकांचे प्रेम मला इथे घेऊन आले
मंडीतील लोक आणि त्यांचे प्रेम मला इथे घेऊन आले आहे. जेव्हा इतिहासाची आठवण होईल, तेव्हा हा काळ कदाचित सुवर्णकाळ म्हणण्यात येईल. मंडीमध्ये अनेक दशकांपूर्वी भ्रूणहत्येचे प्रमाण खूप होते, परंतू त्याच मंडीत आज अनेक मुली संरक्षण क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, राजकारण इत्यादी क्षेत्रात जात असल्याचे कंगना म्हणाली. तसेच काँग्रेस पक्षाची देशविरोधी मानसिकता या देशासाठी चिंतेची बाब आहे. आपल्या चित्रपट कारकिर्दीप्रमाणेच आपली राजकीय कारकीर्दही यशाच्या शिखरावर जाईल, असा विश्वास तिने यावेळी व्यक्त केला.