मुंबई, 01 ऑक्टोंबर (विश्वजीत खाटमोडे) बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्या पायाला बंदुकीची गोळी लागली असल्याची बातमी आहे. या बातमीने देशभरात खळबळ उडाली आहे. रिव्हॉल्व्हर साफ करत असताना गोविंदा यांच्याकडूनच चुकून गोळी लागल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी रिव्हॉल्व्हर साफ करून झाल्यानंतर ते कपाटात ठेवत असताना रिव्हॉल्व्हर अचानकपणे जमिनीवर पडले आणि त्यातून गोळी सुटली, ही गोळी गोविंदा यांच्या पायाला लागली. त्यानंतर गोविंदा यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, गोविंदा यांच्या पायातील गोळी डॉक्टरांनी काढली असून, त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचे सांगण्यात आले आहे.
https://x.com/PTI_News/status/1840981315270652396?t=65hV-xF44t5gMegN2cHEAg&s=19
अशी घडली घटना
मंगळवारी (दि.01) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. गोविंदा यांना कोलकाता येथे एका शोसाठी जायचे होते. त्यासाठी आज सकाळी 6 वाजताची फ्लाईट होती. यावेळी कोलकात्याला जाण्याच्या तयारीत असताना गोविंदा हे रिव्हॉल्व्हर साफ करून कपाटात होते. त्यावेळी ते रिव्हॉल्व्हर चुकून खाली पडले आणि त्यातून गोळी सुटली आणि ती गोविंदा यांच्या पायाला लागली. देवाच्या कृपेने गोविंदा यांच्या फक्त पायाला दुखापत झाली. ही बाब गंभीर नसून काळजीचे कारण नाही, असे गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सांगितले आहे.
https://x.com/PTI_News/status/1840978558815981915?t=pgntu-xC5DH8G9pvUNPk3g&s=19
गोविंदाने मानले चाहत्यांचे आभार
दरम्यान, गोविंदा यांच्यावर सध्या अंधेरीच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, यासंदर्भात गोविंदा यांनी डॉक्टर आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. “तुम्हा सर्वांचे आणि आई-बाबांचे आशीर्वाद. गोळी लागली होती. पण, गुरूंच्या कृपेने गोळी काढली आहे. मी येथील डॉक्टरांचे आभार मानतो. तुमच्या प्रार्थनांबद्दल तुम्हा सर्वांचे आभार,” असे गोविंदा यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.