बारामती, 29 मेः तीन दिवसापूर्वी बारामतीमधील फलटण चौका नजीक एक टँकर व मोटरसायकलचा अपघात होऊन त्या ठिकाणी असणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे एका महिलेला प्राण गमवावा लागला. त्या ठिकाणी अनेक गाड्या फलटण चौक ते कारभारी चौक या दरम्यान पार्किंग केलेल्या असतात. त्यामुळे रस्ता मोठा असला तरीसुद्धा वाहतुकीसाठी तो अरुंद होतो.
या पूर्वीसुद्धा पोलिस अधिकारी कारवाई करत होते. परंतु आता या कारवाई अधिक तीव्र करण्यात आलेली असून शनिवारी एकूण 11 वाहनांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे.
यापुढे फलटण चौक ते कारभारी चौक यादरम्यान कोणीही वाहनधारकांनी रस्त्यावर वाहन पार्किंग करू नये, सदरचा रस्ता हा जड वाहतूक असल्याने अतिशय वर्दळीचा झालेला आहे, पर्यायी पार्किंग जागेचा वापर त्या ठिकाणी करावा, तरी सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी आपल्याकडे येणाऱ्या कस्टमरला पार्किंग इतर ठिकाणी कुठे उपलब्ध आहे, याबाबत मार्गदर्शन करावे. यापुढे सुद्धा या ठिकाणी सतत कारवाई करण्यात येणार आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक जाधव व वाहतूक कर्मचाऱ्यांनी केली आहे.