माळेगाव कारखान्याच्या वाहतूक वाहनांवर कारवाई

बारामती, 15 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर 14 नोव्हेंबर 2022 रोजी कारवाई करण्यात आली. सदर कारवाई बारामती उपप्रादेशिक परिवहनच्या वायुवेग पथकाकडून करण्यात आली.

जळोची सोसायटीच्या चेअरमन पदी पागळे; व्हा. चेअरमन पदी चौधर

वायुवेग पथकाकडून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलरच्या तब्बल 23 वाहनांना तपासून 10 वाहनांवर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई ही विना नोंदनी, विना रिफलेक्टर, विना अनुज्ञप्ती, प्रमाणापेक्षा जास्त उंचीचा माल, अनधिकृत टेप रेकॉर्डर आदी कलमांतर्गत केली. तसेच दोषी वाहनांकडून तब्बल 1 लाख 40 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

बारामतीतील महिलांना तहसिलदारांचे आवाहन

दरम्यान, इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलरवर देखील बारामीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून या प्रकारचीच कारवाई करण्यात आली होती.

One Comment on “माळेगाव कारखान्याच्या वाहतूक वाहनांवर कारवाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *