काळा बाजारात विक्रीसाठी चालविलेल्या रेशनिंगवर कारवाई

बारामती, 24 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथून रेशनिंगचा तांदूळ काळा बाजारात विक्रीसाठी खरेदी करण्यात आला होता. मात्र तो खरेदी केलेला रेशनिंगचा तांदूळ विकण्यासाठी जाताना दुकानदारासह ट्रक चालकाला वडगाव पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.

मासाळवाडीची मुख्य जत्रा उद्यापासून

सदर कारवाईत दुकानदार संतोष शहा (वय 51, रा. वडगाव निंबाळकर, बारामती) व ट्रक चालक किशोर सावंत (वय 41, रा. लिंब. सातारा) या संशयित आरोपींना अटक केली आहे. या दोघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

अबब! बँकेत चक्क 500 रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा

दरम्यान, सदर ट्रकमधून 2 लाख 66 हजार 850 रुपयांचा 325 नायलॉनच्या पिशव्यांमधील माल जप्त केला आहे. या संदर्भात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल पोपट नाळे यांनी संशयित आरोपींविरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.

2 Comments on “काळा बाजारात विक्रीसाठी चालविलेल्या रेशनिंगवर कारवाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *