बानपच्या मान्सून पूर्व कामांची पोलखोल; 9 कोटी 19 लाख पाण्यात!
बारामती शहरातील काही पत्रकार व समाज सेवकांनी या बाबतीत आठवड्यापूर्वी सोशल मीडियावर आवाज उठवला होता. तेव्हापासून बारामती शहर पोलीस ठाणे याबाबत कारवाई करण्यासाठी माहिती काढत होती. गुरुवारी, 29 जुलै 2022 रोजी संध्याकाळी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना माहिती मिळाली की, इसम नामे शाहरुख निसार अत्तार (वय 34 वर्ष रा. काशी विश्वेश्वर मंदिराजवळ) याचे मार्केटमध्ये दुकान आहे. त्यांनी त्याच्या घरी नायलॉन मांजा विक्रीसाठी आणलेले आहेत, अशी माहिती मिळताच महिला पोलीस उपनिरीक्षक संध्या देशमुख, सहाय्यक पोलीस फौजदार संजय जगदाळे, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, पोलीस अंमलदार दशरथ कोळेकर, मनोज पवार, कल्याण खांडेकर, अजित राऊत, बंडू कोठे, अक्षय सिताप यांची वेगवेगळी पथके तयार करून मार्केट मधील बारा दुकानांची तपासणी करण्यात आली.
बारामतीत दोन गावठी पिस्टल, एक रिवाल्वर आणि जिवंत काडतुससह एकाला अटक
सदर तपासणीत शाहरुख निसार आत्तार (वय 34) याचे घर चेक केले असता, त्या ठिकाणी विविध रंगाचे नायलॉनचे 17 बंडल नायलॉन मांजा किंमत अंदाजे 7 हजार रुपये हा त्या ठिकाणी मिळून आला. त्याच्या मांजा हा दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आला आहे. तसेच संशयित आरोपीवर बारामती शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 188, 336, 278 प्रमाणे पर्यावरण अधिनियमाप्रमाणे घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यापुढे सुद्धा शहर पोलीस स्टेशनतर्फे याबाबत छापीमारी करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. नायलॉन दोर पतांगबजीमध्ये जर बारामतीमध्ये कुणी जखमी झाला किंवा जर नायलॉन मांजा लागून मृत्यू झाला तर सदोष मनुष्य वधासारखा गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी नायलॉन मांजा विक्रीसाठी बारामतीमध्ये आणू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.