बारामतीतील दोन सराईतांवर तडीपारची कारवाई

बारामती, 3 नोव्हेंबरः बारामती शहरातील सराईत गुन्हेगार सुनील माने, विनोद माने याच्यावर शहर पोलीस स्टेशनकडून तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचावर गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याने व अलीकडेच त्यांनी हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे त्यांना तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव बारामती शहर पोलिसातर्फे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे पाठवण्यात आला होता.

बारामतीत दोन दिवसीय गणस्तरीय कार्यशाळा

पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांना सहा महिन्याकरीता बारामतीसह इंदापूर, दौंड, पुरंदर, तसेच नजीकच्या फलटण तालुक्यातून तडीपारचे आदेश काढले. सदर आदेशाची बजावणी करण्याचे आदेश नवनियुक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी तात्काळ बारामती शहर पोलिसांना दिले. त्याप्रमाणे आज, 3 नोव्हेंबर 2022 रोजी या दोन्ही आरोपीविरुद्ध तडीपारीची नोटीस बजावणी करण्यात येऊन त्यांना सहा महिन्याकरता पाच तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

बारामतीत दोन दिवसीय गणस्तरीय कार्यशाळा

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस कर्मचारी अजित राऊत, दशरथ इंगोले, संजय जगडा, जगदाळे, दशरथ कोळेकर यांनी केली आहे. काही दिवसापूर्वीच अक्षय उर्फ मोरया जाधव याला झोपडपट्टी दादा कायद्याप्रमाणे एक वर्षासाठी स्थानबद्ध केलेली आहे आणि तेच आदेश उच्च न्यायालयाने सुद्धा कायम केले आहेत.

One Comment on “बारामतीतील दोन सराईतांवर तडीपारची कारवाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *