पैसे दुप्पट करतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई

बारामती, 23 मार्चः बारामती शहर पोलीस स्टेशनने धडाकेबाज कामगिरी करत बनावट नोटांचा डाव उधळून लावला आहे. शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत बनावट नोटा घेऊन आलेला एका संशयिताला अटक केली आहे. तसेच या बनावट नोटांना बळी पडून दुप्पट पैसे मिळणार या आशेने आलेल्या सांगली जिल्ह्यातील एका व्यक्तीचे तब्बल 3 लाख 95 हजार रुपये शहर पोलिसांच्या कारवाईमुळे वाचले आहे. सदर छापेमारीत एका संशयिताला अटक केली असून या मागील मास्टरमाइंड अद्यापही फरार आहे. सदर प्रकरणी दिलीप सावंत (वय 67, रा. पलूस, जिल्हा सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून 18 मार्च रोजी व त्या अगोदर सांगली जिल्ह्यातील पलूस गावचे दिलीप सावंत (वय 67 वर्ष) यांना एका इसमाने मोबाईलद्वारे बतावणी केली की, त्यांच्याकडे दोन नंबरचे लाखो रुपये आहेत. तुम्ही जेवढे पैसे आणाल, त्याच्या दुप्पट पैसे त्यांना देण्यात येतील. सदर पैसे काळ्या कोटिंगमधून तस्करीच्या स्वरूपात आलेले आहेत, असे सांगितले. त्यांना अनेक वेळा फोनवरून पटवूनही देण्यात आले.

 

सरकारी कार्यालयांमध्ये चाललेला खाजगीकरणाचा जीआर रद्द करण्यासाठी अ‍ॅड. कांचनकन्होजा खरातांचे निवेदन

फिर्यादीचा मुलगा इंजिनियर असून बेकार आहे. कमी कष्टात जास्त पैसे मिळत असतील, तर बेकारी दूर होईल, असे त्यांना वाटले आणि ते सापळ्यात अडकले. मग भामट्याने त्यांना बारामती येथील फलटण रोडवर बोलवले. त्यापूर्वी नातेपुते तसेच फलटण या ठिकाणी सुद्धा बोलवले. परंतु त्या ठिकाणी काही कारणास्तव भेटीगाठी झालेल्या नाही. फिरवून फिरवून शेवटी फलटण रोड, बारामती या ठिकाणी बोलावले.

सदर भेटीवेली फिर्यादीने सोबत 3 लाख 95 हजार रुपये घेऊन आले. तसेच भामटा एका बॅगेमध्ये वह्या व दुसऱ्या बॅगेत नोटांचे बंडल घेऊन आला. सोबत आय टेन गाडी क्रमांक एम एच 09 बीबी 4307 गाडी होती. गाडीच्या डिक्कीमध्ये रस्त्यातच दोन्ही बॅगा फिर्यादी यांना दाखवण्यात आल्या. त्यांना सांगण्यात आले की, यात लाखो रुपये आहेत, तुम्ही जेवढे द्याल त्याच्या दुप्पट देतो, असे सांगण्यात आले.
फिर्यादी व आलेला भामटा एकमेकांना आजमावत होते. फिर्यादीला भामटा सांगत होता, ‘तू आणलेले पैसे त्याला दे, लगेच तो दोन्ही बॅगा त्याला देईल’. फिर्यादी म्हणत होता, ‘खोलून बॅग दाखव व पैसे मोजून दे’, अशी त्यांची चर्चा चालू असताना सदरची बातमी बारामती शहर पोलिसांना समजली.

बारामतीच्या काव्यहिरकणी प्रकाशनचा कार्यक्रम रंगला काव्यमैफलीने!

पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला. या छापेमारीत कारसहित फिर्यादी, फिर्यादीचा मुलगा, त्याच्यासोबत आलेला आणखी एक संशयित आरोपी असे सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले. त्यांच्याकडे काय प्रकार आहे, याबाबत सविस्तर चौकशी केली. बॅग खोलून पाहण्यात आल्यावर सदर बॅगमध्ये प्रथम दर्शनी नोटांचे बंडल दिसून आले. परंतु बारकाईने पाहणी केली असता शंभर आणि पाचशे रुपये दराच्या नोटींची एक गड्डी व अशा एकत्र बांधलेल्या दहा ते बारा गड्डीचा एक गठ्ठा असे नोटांचे चार गठ्ठे व त्यावर एक ओरिजनल पाचशे रुपयाची नोट लावलेली. त्याखाली खेळणीमधील चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे लिहिलेले. परंतु हुबेहूब पाचशे रुपयांच्या नोटेसारखी दिसणाऱ्या नोटेची झेरॉक्स मारून फिर्यादीला नोटाचा बंडेल दिसेल, अशा पद्धतीने बांधलेले चार गट्टे मिळून आले.
तसेच नोटांच्या आकाराच्या कापलेल्या काळ्या कागदाच्या पट्ट्या एका पिशवीत मिळून आल्या. दुसऱ्या पिशवीमध्ये कुलूप असलेले व त्यामध्ये शालेय वह्या बाहेरून बागेत नोटा आहेत, असे दाखवण्यासाठी ठेवलेल्या मिळून आल्या.

तसेच फिर्यादीकडे त्याने आणलेले 3 लाख 95 हजार रुपये मिळाले. यामध्ये फिर्यादीला त्याचे ओरिजनल पैसे काढून घेऊन तो लोभीपणाने दुप्पट पैशाच्या अशाने आला आहे, त्याला नोटांची बनावट कागद देऊन त्याची लुबाडण्याचा उद्देश पोलीस चौकशीमध्ये दिसून आला. त्यामुळे आलेला भामटा संशयित आरोपी प्रसाद टकले (वय 26, सध्या रा. प्रगती नगर शेळके वस्ती, बारामती व कायमचा पत्ता अहमदनगर) याला पोलिसांनी अटक करून पाच दिवस पोलीस कोठडी रिमांड घेतली आहे. आरोपीच्या चौकशीत गौतम पाटील हा या फसवणुकी मागचा मास्टरमाइंड असल्याचे त्यांनी सांगितले. तो सुद्धा मोबाईलमधून संशयित आरोपीच्या संपर्कात होता. परंतु पोलिसांनी सर्वांना पकडल्यामुळे तो त्या ठिकाणावरून पळून गेला. त्याचे नाव गौतम पाटील हे सुद्धा बनावट असावे, असे एकंदरीत चौकशीतून दिसून आले आहे. पोलिसांनी आरोपीची 2 लाख ते 3 लाख रुपये किमतीची कार जप्त करून सदरच्या कागदी झेरॉक्सच्या नोटा जप्त केल्या आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, तपास पथकाचे पोलीस हवालदार कल्याण खांडेकर, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, संजय जाधव, तुषार चव्हाण, शाहू राणे, अशोक जामदार, अक्षय सिताफ यांनी केली आहे.

One Comment on “पैसे दुप्पट करतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *